Take a fresh look at your lifestyle.

सोन्याला पुन्हा झळाळी.. पाहा गुंतवणू्कदार काय म्हणतात..?

नवी दिल्ली : कोरोना संकटामुळे भारतीय बाजारात सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सोन्यासाठी तर हे वर्ष सर्वात अस्थिर ठरले आहे. काही वर्षांत डिजिटल गोल्ड, बाँड्ससारख्या नवीन पर्यायांमुळे गुंतवणूकदारांना अधिक नवीन संधी मिळाल्या आहेत. सरकार वेळोवेळी सॉवरेन गोल्ड बॉन्ड (Sovereign Gold Bond) जारी करते. मात्र, कोरोना संकटामुळे त्यात खोडा येत आहेत.

Advertisement

मागील वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याचा भाव विक्रमी पातळीवर गेला होता. नंतर सोन्याच्या किंमतीत (gold price) सातत्याने घसरणच झाली आहे. आतापर्यंत सुमारे 9000 रुपयांनी सोने स्वस्त झाले होते, मात्र आता पुन्हा एकदा सोन्याला झळाळी येऊ लागली आहे. त्यामुळे सोने गुंतवणुकीसाठी हीच योग्य वेळ असल्याचं तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement

दरम्यान, आजच्या दिल्ली बुलियन मार्केटबद्दल बोलायचे झाल्यास, सोन्याच्या किमतीत 119 रुपयांनी वाढ झाली होती. सोन्याचा भाव 47,995 रुपये तोळा झाला होता. मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 47,876 रुपयांवर बंद झाले होते. मात्र, मागील वर्षी सोन्याने 56000 रुपये तोळा भाव गाठला होता. हा रेकॉर्ड अजून कायम आहे.

Advertisement

IIFL सिक्युरिटीजचे व्हाईस प्रेसिडेंट (रिसर्च) अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, दिवाळीपर्यंत सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 55000 रुपयांचा टप्पा ओलांडू शकतात. अशा परिस्थितीत दीर्घ कालावधीसाठी सोन्यात गुंतवणूक करणे योग्य ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisement

मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसच्या अहवालानुसार, यंदा सोने 56000च्या विक्रमी पातळीवर जाऊ शकते. खरं तर शेवटच्या वेळी जेव्हा कोरोनाची प्रकरणे वाढू लागली, तेव्हा सोन्याच्या किमती वाढू लागल्या. आता दुसऱ्या टप्प्यात संसर्गाची प्रकरणे वाढत असताना, त्याचा परिणामही किमतीवर दिसत आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply