Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. तब्बल ८ कोटींच्या मिठाचाच बसला की झटका; पहा कुठे आणि कशी घडली ही दुर्घटना

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाने देशातील आठ राज्यात हाहाकार उडाला आहे. गुजरात राज्यास या चक्रीवादळाचा मोठा फटका बसला असून त्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. या राज्यात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. हजारो घरांचे नुकसान झाले आहे. तसेच मानवी जीवनात अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या मिठाचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. होय, मीठ किती महत्वाचे आहे, हे आपल्या सगळ्यांना माहित आहेच. या मिठाचेच वादळाने नुकसान केले आहे.

Advertisement

या वादळानंतर आलेल्या पुरात कच्छ वाळवंटात जमा असलेले जवळपास दहा कोटी रुपयांचे मीठ वाहून गेले आहे. अगरिया हितरक्षक समितीचे जिल्हा संयोजक भारत सुमेरिया यांनी सांगितले, की जवळपास तीन लाख टन मीठ या वादळामुळे वाया गेले आहे. जवळपास १२ लाख टन मीठ याआधीच गोदामात पोहोचवण्यात आले होते. मात्र, तीन लाख टन मीठ अजूनही येथे होते. वादळात हे सर्व मीठ वाहून गेले आहे. त्यामुळे मिठाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Advertisement

या वादळाने देशातील तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, राजस्थान या राज्यांत मोठे नुकसान केले आहे. आता या वादळाचा जोर कमी झाला आहे. मात्र, या वादळामुळे आता उत्तर भारतातील काही राज्यांत पाऊस होत आहेे. करोनाच्या संकटात या नैसर्गिक संकटाने अडचणी वाढवल्या आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांना या संकटांचाही सामना करावा लागत आहे. या वादळामुळे नुकसानग्रस्त गुजरात राज्यास एक हजार कोटी रुपये मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली होती. तसेच अन्य नुकसानग्रस्त राज्यांनाही मदत देणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. या वादळामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबांना दोन लाख रुपये तर जखमी झालेल्यांना पन्नास हजार रुपये मदत देण्याचा निर्णय याआधी केंद्र सरकारने घेतला आहे.

Advertisement

दरम्यान, आता तौक्ते चक्रीवादळाचा जोर ओसरला आहे. या संकटातून बाहेर पडत असतानाच यास चक्रीवादळ येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्यांना या वादळाचा फटका बसण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आधी मागील वर्षी या दोन्ही राज्यांना अम्फान या वादळाचा जोरदार तडाखा बसला होता. या वादळाने सुद्धा मोठे नुकसान केले होते. त्यानंतर आता पुन्हा यास चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply