Take a fresh look at your lifestyle.

माॅन्सून अंदमानात दाखल..! वाचा महाराष्ट्रात कधीपर्यंत येणार पाऊस..?

मुंबई : तौक्ते वादळामुळे (tauktae cyclone) गोवा, महाराष्ट्र, गुजरातसह पश्चिम किनारपट्टीवरील राज्यांचे प्रचंड नुकसान झाले. मात्र, या वादळाने माॅन्सूनचे ढगही भारतापर्यंत खेचून आणले.

Advertisement

हवामान विभागाने 21 मे रोजी माॅन्सून (Monsoon) अंदमानात धडकणार असल्याचं अंदाज वर्तवला होता. त्यानुसार आज (ता.21) बरोबर वेळेत माॅन्सून अंदमानात दाखल झाला. साधारणपणे अंदमानवरून केरळपर्यंत मोसमी पावसाचा प्रवास १२ दिवसांपर्यंतचा असतो. मात्र, तौक्ते वादळामुळे सातव्या दिवशीच तो केरळात दाखल होण्याची शक्यता आहे. 1 जून रोजी केरळमध्ये माॅन्सून धडक देणार असल्याचे हवामान विभागाने जाहीर केले आहे.

Advertisement

हवामान विभागाच्या माहितीनुसार, अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते वादळाचा प्रभाव गुरुवारी (ता. 20) पूर्ण ओसरला. राजस्थानातही पाऊस उघडला आहे. नैऋत्य मोसमी वारे आज अंदमान बेटांवर पोहोचले. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे निकोबार बेट, बंगालचा उपसागर, संपूर्ण अंदमान आणि उत्तर अंदमानाच्या काही भागात माॅन्सूनचा परिणाम दिसत आहे. पुढील 48 तास हा परिणाम कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

Advertisement

महाराष्ट्रात 15 जूनपासून पाऊस

Advertisement

सध्या माॅन्सूनसाठी पोषक वातावरण आहे. परिणामी, 1 जून रोजी माॅन्सून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर 10 जूनपर्यंत तो तळकोकणात येऊ शकतो. त्यानंतर 15 ते 20 जूनदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात माॅन्सूनच्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply