Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारचा पुन्हा ‘आरबीआय’च्या खिशात हात, पहा किती रक्कम घेणार..?

नवी दिल्ली : कोरोनामुळे आर्थिक मंदीचे मळभ दाटलेले आहे. अनेक उद्योग- धंदे बंद असल्याने सरकारचेही ‘इन्कम’ बंद झाले आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीतही खडखडाट आहे. अशा वेळी कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी सरकारला निधीची कमतरता जाणवत आहे. अशा संकट काळात पुन्हा एकदा भारतीय रिझर्व्ह बँक (Indian Reserve Bank) मोदी सरकारच्या मदतीला धावून आली आहे.

Advertisement

आर्थिक स्थिती, जागतिक आणि घरगुती समस्यांचा आढावा घेण्यासाठी ‘आरबीआय’ने सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची (central board of Directors) बैठक बोलावली होती. बैठकीत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबतही चर्चा करण्यात आली. सेंट्रल बोर्डाने या कालावधीत रिझर्व्ह बँकेला वार्षिक अहवाल आणि खात्यांसाठी मंजुरी दिली आहे. दरम्यान, ‘आरबीआय’ला विदेशी मुद्रा विक्रीतून चांगली कमाई झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेंट्रल बोर्डाने कोरोनाच्या संकट काळात खजिन्यातील 99,122 कोटी रुपये केंद्र सरकारला देण्याचा निर्णय घेतला. ही अतिरिक्त रक्कम केंद्र सरकारला वर्ग करण्याच्या प्रस्तावाला बोर्डाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Advertisement

जुलै 2020 ते मार्च 2021 या कालावधीतील 9 महिन्यांची अतिरिक्त रक्कम ‘आरबीआय’ केंद्र सरकारकडे वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. ‘आरबीआय’चे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखालील आयोजीत बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply