Take a fresh look at your lifestyle.

धंदे की बात..! मोदी सरकारने आणलीय ग्रामीण भागासाठी ‘ही’ योजना

मुंबई : कोरोना संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. उद्योग-धंदे बंद झाले. बेरोजगारीचे मोठे संकट कोसळले. मात्र, आता तुम्ही एखादा स्वतःचाच ‘बिजनेस’ सुरु करण्याच्या विचारात असाल, तर मोदी सरकारने तुमच्यासाठी खास संधी उपलब्ध करून दिली आहे.

Advertisement

केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात ‘एलपीजी डिलिव्हरी सेंटर’ सुरू करण्यात येणार आहेत. प्रामुख्याने ग्रामीण आणि निमशहरी भागांमध्ये हे ‘एलपीजी डिलिव्हरी सेंटर’ सुरू करण्याचे सरकारचे उद्दिष्ट्य आहे. त्याद्वारे ग्रामीण भागातील लोकांना ‘बिझनेस’ची संधी मिळणार आहे. सध्या या योजनेवर काम सुरू असून, पुढील वर्षीच्या मार्चपर्यंत योजना सुरू होण्याची शक्यता आहे.

Advertisement

देशात 1 लाख एलपीजी वितरण केंद्र सुरू करण्याची योजना कॉमन सर्विस सेंटरकडून (common service centre) आखण्यात आली आहे. ‘एलपीजी डिलिव्हरी सेंटर’ सुरु करण्यासाठी https://csc.gov.in/cscspvinfo या वेबसाइटवर अर्ज करावा लागेल. ‘सीएससी’ची मान्यता मिळाल्यानंतर बँकिंग, विमा, पॅनकार्ड आणि पासपोर्ट बनविण्याची सेवाही आपण देऊ शकता. तसेच वीजबिले भरणे, ‘आयआरसीटीसी’कडून तिकीट बुकिंग, शिक्षण व कौशल्य विकास संबंधित अभ्यासक्रमदेखील भरून देता येईल. आता सरकार ‘सीएससी’मार्फत एलपीजी (LPG) सिलिंडर वितरण करणार आहे, त्याचे मुख्य काम आपल्याला मिळू शकतं.

Advertisement

देशभरात 21000 एलपीजी केंद्र ‘सीएससी’कडून सध्या सुरू करण्यात येणार आहेत. भारत पेट्रोलियम (बीपीसीएल), हिंदुस्तान पेट्रोलियम (एचपीसीएल) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) यांच्याशी करार करण्यात आला आहे.

Advertisement

‘बीपीसीएल’बरोबर 10,000, ‘एचपीसीएल’सोबत 5 हजार, तर ‘इंडियन ऑइल’सोबत 5 हजार एलपीजी केंद्रे सुरू केली आहेत. मात्र, आमचा मुख्य लक्ष्य ग्रामीण भागात केंद्रांचा विस्तार करण्यावर असल्याचे ‘सीएससी’चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश त्यागी यांनी सांगितले.

Advertisement

ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना शुद्ध इंधन पुरविण्यासाठी अधिकाधिक एलपीजी सेंटर सुरू करीत आहोत. सर्व राज्यांमध्ये ‘सीएससी’ने ही एलपीजी वितरण केंद्रे सुरु केली आहेत. पैकी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थानमध्ये सर्वात जास्त केंद्रे असल्याचे ‘सीएससी एसपीव्ही’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार राकेश यांनी सांगितले.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply