Take a fresh look at your lifestyle.

झाली की सोय; DRDO ने केलीय कमाल, फ़क़्त 75 रुपयात होणार करोना अँटिबॉडीज परीक्षण

मुंबई : कोणालाही करोना होऊन गेला किंवा नाही हे चेक करण्यासाठी अँटिबॉडीज टेस्ट करावी लागते. या टेस्टसत्हो होणारा मोठा खर्च लक्षात घेता अनेकजण याच्या वाटेला जात नाहीत. त्यामुळे लक्षणे नसताना करोना होऊन गेलेल्या नागरिकांमध्ये अँटिबॉडीज आहेत का, याकडे आपण लक्ष देत नाही. मात्र, अँटिबॉडीज आहेत किंवा नाहीत हे तपासणे आता खूप सोपे होणार आहे.

Advertisement

होय, फ़क़्त 75 रुपयात अँटिबॉडीज परीक्षण करण्याची सोय आता होत आहे. डीआरडीओने कोविड 19 अँटिबॉडीज शोधण्यासाठी एक किट विकसित केले आहे. दिपकोव्हन किट (DIPCOVAN किट SARS-CoV-2 ) करोना विषाणूचे प्रथिन शोधू शकणार आहे. दिल्लीस्थित वेनगार्ड डाइग्नोस्टिक प्राइवेट लिमिटेडच्या सहकार्याने हे किट बनविण्यात आले आहे. या किटची चाचणी घेण्यासाठी दिल्लीतील वेगवेगळ्या कोविड हॉस्पिटलमधून 1000 रूग्णांचे नमुने घेण्यात आले.

Advertisement

यावर्षी एप्रिलमध्ये आयसीएमआरने या अँटीबॉडी डिटेक्शन किटला मान्यता दिली आहे. त्याच महिन्यात या उत्पादनास आरोग्य मंत्रालयाच्या ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (डीसीजीआय) मान्यताही मिळाली. त्यास उत्पादन, वितरण व विक्री करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या किटमधून 75 मिनिटांत अँटीबॉडी परीक्षण करून रिपोर्ट हातात येणे शक्य आहे. या किटची शेल्फ लाईफ 18 महिने आहे. डीआरजीओचा भागीदार वेनगार्ड डाइग्नोस्टिक जूनच्या पहिल्या आठवड्यात या कीटला बाजारात आणणार आहे. लॉन्चवेळी सुमारे 100 किट बाजारात आणल्या जातील. एक किट सुमारे 100 चाचण्या करू शकणार आहे.

Advertisement

या कंपनीकडे सध्या दरमहा फ़क़्त 500 किट बनविण्याची क्षमता आहे. नागरिकांना प्रत्येक चाचणीची किंमत सुमारे 75 रुपये असेल. बर्‍याच वेळा एसीम्प्टोमॅटिक रूग्णांना माहित नसते की त्यांना कोरोना संसर्ग झाला होता किंवा नाही. या चाचणी किटमधून चाचणी केल्यावर अँटीबॉडी आढळल्यास संबंधित व्यक्तीला करोना संसर्ग होऊन गेल्याचे कळणार आहे.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply