Take a fresh look at your lifestyle.

चीनने घेतलाय ‘तो’ महत्वाचा निर्णय; पहा कशा पद्धतीने होणार अनेक देशांना फायदा

बीजिंग : करोना विषाणूच्या संकटाने अनेक देश हैराण झाले आहे. या विषाणूला रोखण्यासाठी लसीकरण एक प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे जगभरातील देशांनी लसीकरणावर भर दिला आहे. मात्र, जगात अनेक देश गरीब आहेत. त्यामुळे त्यांना लसींसाठी अन्य देशांवर अवलंबून रहावे लागत आहे. सुरुवातील भारताने जगातील अनेक देशांना लस देऊन मदत केली. आता मात्र, तशी परिस्थिती राहिलेली नाही. अशावेळी भारताचा मुजोर शेजारी असलेल्या चीनने त्यात पुढाकार घेतला आहे.

Advertisement

भारतातच करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढ होत असल्याने अन्य देशांना लस देणे भारताला निदान आज तरी शक्य नाही. तर दुसरीकडे अमेरिकेने देशांना लस देणार असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेच्या घोषणेनंतर मागे राहिल तो चीन कसला, यानंतर चीनने सुद्धा आफ्रिकेतील जवळपास ४० देशांना करोना प्रतिबंधक लस देणार असल्याची घोषणा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. आफ्रिकेतील देश करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामुळे या देशांना तातडीने करोना लसींची आवश्यकता आहे. चीनमध्येही लसीकरण सुरू आहे. तरी देखील आफ्रिकेतील देशांची गरज पाहता हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

चीन आफ्रिकेतील देशांना लस देणार आहे. यामध्येही चीनने आपले मनसुबे साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश असणारा भारत आज करोनाच्या विळख्यात अडकला आहे. या विषाणूच्या दुसऱ्या लाटेत देशात रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात करोना प्रतिबंगधक लसीकरणही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे देशात लसींची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशात लसींची कमतरता जाणवत असल्याने लसीकरणात अडचणी येत आहेत.

Advertisement

अशा परिस्थितीत दुसऱ्या देशांना लस देणे भारतास आजिबात शक्य नाही, हे चीनला माहित आहे. तसेच अमेरिकेने सुद्ध काही देशांना लसी देण्याची घोषणा केली आहे. या परिस्थितीचा फायदा चीनने घेतला आहे. अमेरिकेवर कुरघोडी करण्यासाठी तातडीने आफ्रिकेतील देशांना लस देण्याची घोषणा चीनने केली आहे. चीनच्या या निर्णयाने आफ्रिकेतील देशांना मात्र संकट काळात दिलासा मिळाला आहे.

Advertisement

चीनने याआधीही काही देशांना लसी दिल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा जवळपास ४० देशांना लसी देणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेने सुद्धा जगातील गरीब देशांना श्रीमंत देशांनी लस द्यावी, असे आवाहन केले होते. कारण, करोना प्रतिबंधक लसींचा मोठा साठा श्रीमंत देशांकडे आहे. तसेच काही देशांनी लस उत्पादक कंपन्यांना कोट्यावधींच्या लसींची ऑर्डर देऊन ठेवली आहे. अशा परिस्थितीत गरीब देशांना लस मिळणे कठीण होणार आहे. त्यामुळेत जागतिक आरोग्य संघटनेने श्रीमंत देशांना आवाहन केले होते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply