Take a fresh look at your lifestyle.

१० हजारात मिळतोय इन्फिनिक्स हॉट १० एस; पहा नेमके काय आहेत फीचर्स व स्पेसिफिकेशन

मुंबई : प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड इन्फिनिक्सने नवा रिफ्रेशिंग हॉट १० एस हा नो कॉम्प्रमाइज स्मार्टफोन सादर केला आहे. हा प्रो-गेमर्ससाठी एक ऑल-राउंडर स्मार्टफोन असून पॉवरफुल प्रोसेसर, स्मूथ डिस्प्ले, मोठी स्क्रीन, ऑप्टिमाइज्ड सॉफ्टवेअर आणि मोठ्या बॅटरीसह येतो.

Advertisement

हा स्मार्टफोन हार्ट ऑफ ओशन, मोरांडी ग्रीन, ७-डिग्री पर्पल आणि ९५ डिग्री ब्लॅक अशा चार रंगात उपलब्ध आहे. हा २७ मे २०२१ पासून फ्लिपकार्टर ४जीबी रॅम + ६४जीबी प्रकारात ९९९९ रुपयांत तर ६ जीबी रॅम + ६४ जीबी प्रकारात १०,९९९ रुपये अशा किफायतशीर किंमतीत उपलब्ध आहे. त्याचे फीचर्स असे :

Advertisement
  • हा स्मार्टफोन व्हिडिओ पाहण्याच्या सर्वोत्कृष्ट अनुभवाकरिता ६.८२” एचडी+ सिनेमॅटिक डिस्प्ले, ९० एचझेड रिफ्रेश रेट आणि १८० एचझेड टच सँपलिंग रेटसह तसेच डीटीएस सराउंड साउंड प्रदान करतो. प्रो- लोव्हल गेमर्सच्या सर्व गरजा लक्षात घेत इन्फिनिक्स हॉट १० एस स्मार्टफोनमध्ये उत्कृष्ट प्रोसेसर हेलिओ जी८५ ऑक्टा कोअर ६४ बिट प्रोसेसर आहे.
  • गेमिंग कामगिरी नेक्स्ट लेव्हलवर नेण्याकरिता, स्मार्टफोनमध्ये नवे डार-लिंक गेम बूस्ट तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाने कॉल ऑफ ड्युटी, फ्री फायर, पब्जी इत्यादी हेवी गेममध्येही गेमिंग इंटरअॅक्शन आणि डिस्प्लेचा चांगला अनुभव येतो.
  • मोबाईल ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम + ६४ जीबी या दोन मेमरी प्रकारात उपलब्ध असलेल्या हॉट १० एस मध्ये ३ कार्ड स्लॉट असून २५६ जीबीपर्यंत विस्तारण्यायोग्य मेमरी आहे. हे उपकरण अत्याधुनिक अँड्रॉइड ११ वर ऑपरेट होते. आधुनिक एक्सओएस ७.६ स्कीनद्वारे यूझर्सना सहज आणि वेगवान सॉफ्टवेअर यूएक्स वापरता येते. थेफ्ट अलर्ट, पीक प्रूफ आणि किड्स मोडदेखील यात आहे.
  • हॉट १० एस स्मार्टफोनमध्ये इन्फिनिक्सने सब १० के श्रेणीतही सर्वोत्कृष्ट कॅमेरा देण्याचे तत्त्व पाळले आहे. यात ४८एमपी एआय ट्रिपल रिअर कॅमेरा असून त्यात f/1.79 लार्ज अपार्चर आणि क्वाड एलईडी कॅटेगरी आहे. यात २ एमपी डेफ्थ सेंसर असून याद्वारे परफेक्ट वाइड शॉट्स टिपता येतात.
  • हॉट १० एसमध्ये हेवी-ड्युटी ६००० एमएएच बॅटरी असून ती स्मार्टफोनला दीर्घकाळ हेवी वापर केल्यानंतर कार्यरत ठेवते. बॅटरी स्मार्टफोनला ५५ दिवसांचा स्टँडबाय टाइम देते. तसेच २७ तासांपर्यंतचा नॉनस्टॉप व्हिडिओ प्लेबॅक, १७ तास गेमिंग, ५२ तास ४जी टॉक टाइम, १८२ तास म्युझिक प्लेबॅक आणि १७ तासांचे वेबसर्फिग करता येते.

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply