Take a fresh look at your lifestyle.

म्हणून ‘तिथे’ झालेत आयसीयूमध्ये जास्त मृत्यू; करोना रुग्णांना मिळेनात योग्य उपचारही..!

दिल्ली : करोना विषाणूचा प्रकोपाने अवघे जग हैराण झाले आहे. या व्हायरसला अजूनही नियंत्रणात आणता आलेले नाही. काही देशात या विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या भयानक संकटातून सुटका करुन घेण्यासाठी आज प्रत्येक देश संघर्ष करत आहे. मात्र, दुसरीकडे जगात असे ही काही देश आहेत. या संकटाचा सामना तर करत आहेत मात्र या देशांकडे आवश्यक वैद्यकीय उपकरणेच नाहीत. करोना संक्रमित रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक उपकरणेच या देशांकडे नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Advertisement

याबाबत एक सर्वे करण्यात आला होता. या सर्वेत आफ्रिकेतील इजिप्त, घाना, केनिया, मालावी, लिबिया, मोजांबिक, नायजर, नायजेरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांतील रुग्णांचा समावेश करण्यात आला होता. या सर्वेत असे दिसून आले, की आशिया, युरोप आणि अमेरिकेत सरासरी ३१.५ टक्के गंभीर परिस्थितीत असलेल्या रुग्णांचा आयसीयूत मृत्यू झाला. मात्र, त्या तुलनेत आफ्रिकेतील देशात हा आकडा ४८.२ टक्के इतका आहे.

Advertisement

तसे पाहिले तर आफ्रिका खंडातील जवळपास सर्वच देश गरीब आहेत. या देशांच्या अर्थव्यवस्थाही कमजोर आहेत. अन्य देशांच्या तुलनेत येथील देश विकासाच्या बाबतीत खूपच मागे आहेत. गरीबी, निरक्षरता, बेरोजगारी अशा अनेक समस्या या देशांमध्ये  आहेत. त्यामुळे या देशांची आजची परिस्थिती खराब आहे. करोना संकटाच्या काळात तर या देशांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे. देशात आरोग्य व्यवस्था नाहीत. त्यामुळे रुग्णांना औषधोपचार मिळत नाहीत. करोना प्रतिबंधक लसीही मिळत नाहीत. या देशांना विकसित देशांच्या मदतीवरच अवलंबून रहावे लागत आहे. करोना संकटकाळात तर या समस्या स्पष्टपणे दिसत आहेत.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेने करोना संकटाच्या काळात जगातील गरीब देशांना श्रीमंत देशांनी मदत करावी, असेे आवाहन याआधीच केले आहे. विकसित देशांकडून या देशांना मदत करण्यात येत आहे. आताही करोनाचे संकट जसजसे वाढत आहे तसे या देशांच्या अडचणीतही वाढ होत आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती अतिशय खराब असल्याने या संकटावर मात करण्यातही अडचणी येत आहेत. करोनामुळे आफ्रिकेत आतापर्यंत १ लाख ३० हजार करोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशात करोना प्रतिबंधक लसीकरणही अत्यंत धिम्या गतीने होत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात भितीचे वातावरण आहे. जगात करोना विषाणूचे संकट अजून टळलेला नाही. या विषाणूने आपल्या रुपात अनेकदा बदल केला आहे. करोनाच्या नव्या स्ट्रेनचा धोका आफ्रिकी देशांनाही आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply