Take a fresh look at your lifestyle.

भाजपने दिलेय मोदींवरील प्रश्नाला ‘भन्नाट’ प्रत्युत्तर; पहा नेमके काय म्हटलेय मुख्यमंत्री ठाकरेंना

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका देशातील आठ राज्यांना बसला आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचाच दौरा केला आणि या नुकसानग्रस्त राज्यास एक हजार कोटींच्या मदत निधीची घोषणा केली. यानंतर मोदींच्या गुजरात दौऱ्यावरुन सुरू झालेले राजकारण अजूनही थांबलेले नाही. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारचे मंत्री तसेच राजकीय पक्षांचे नेते या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका करत आहे. मोदींना फक्त गुजरातचाच दौरा का केला, हा भेदभाव कशासाठी असे सवाल विरोधक करत आहेत. त्यावर भाजपचे नेते सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका केली आहे. तौक्ते चक्रीवादळाने कोकणात मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे येथील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणच्या दौऱ्यावर आहेत. याच मुद्द्यावर फडणवीस यांनी टीका करत काही सवाल उपस्थित केले आहेत. फडणवीस म्हणाले, की पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्येच का गेले, असा सवाल करता मग, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा दोनच जिल्ह्यात का आले, इतर जिल्ह्यात का जात नाहीत असा सवाल त्यांनी देवगड येथे पत्रकार परिषदेत केला. वादळाचा फटका राज्यातील अन्य जिल्ह्यांनाही बसला आहे. मग, त्या जिल्ह्यात मुख्यमंत्री का गेले नाहीत, असेच आता आम्ही म्हणायचे का असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका केली.

Advertisement

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळाने देशातील आठ राज्यांत नुकसान केले आहे. त्यामुळे या सर्व राज्यांना मदत देणार असल्याचे केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केले आहे. तरी देखील या मुद्द्यावर राजकारण सुरू आहे. आता  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकणच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर राज्यातील विरोधी पक्षांनी टीका सुरू केली आहे. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेंट करत आहेत. मागील वर्षी निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झाले होते. मात्र, त्यावेळी सुद्धा राज्य सरकारने काहीही केले नाही, अशी टीका भाजपकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राजकारण थांबण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. संकटाच्या काळात राजकारण जोरात सुरू आहे. करोनाच्या संकटाच्या काळात तर प्रत्येक मुद्द्यावर राजकारण होत आहे. राजकीय पक्षांकडून एकमेकांवर केले जाणारे आरोप-प्रत्यारोप तर आता नेहमीचेच झाले आहेत. देशातील जनता याचा प्रत्यय रोजच घेत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply