Take a fresh look at your lifestyle.

बजाव ताली.. पेट्रोल ‘त्या’ठिकाणी गेले की थेट शंभरीपार..!

मुंबई : देशात करोना विषाणूने थैमान घातले आहे. या संकटातून दिलासा मिळण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. त्यातच आता महागाई, बेरोजगारीच्या संकटांची भर पडली आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यन नागरिक पुरते हैराण झाले आहेत. इंधनाच्या किमती वाढत असल्याने नागरिकांच्या अडचणी सुद्धा वाढल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ करत आहेत.

Advertisement

मागील महिन्यात देशातील पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत्या. त्यामुळे या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नाही. मात्र, जशा निवडणुका पार पडल्या त्यानंतर लगेचच इंधनाचे दर वाढण्यास सुरुवात झाली. ही दरवाढ अजूनही कायम आहे. याचा परिणाम असा झाला आहे की देशातील काही राज्यात पेट्रोल शंभर रुपयांच्याही पुढे गेले आहे तर काही राज्यात शंभरी गाठण्याच्या नजीक आहे. देशातील काही शहरांतील इंधनाचे दर पाहिल्यास हे तत्काळ लक्षात येईल.

Advertisement

राजस्थानातील श्रीगंगानगर शहरात पेट्रोल १०४ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील अनेक शहरात पेट्रोलने शंभरी पार केली आहे. रीवा शहरात पेट्रोल १०३ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये दराने विक्री होत आहे. तसेच अनुपपूर १०३.६८, महाराष्ट्रातील परभणी १०१.६५, मध्य प्रदेशातील इंदौर १०१.१८ तसेच भोपाळ शहरात पेट्रोल १०१.११ रुपये प्रति लीटर दराने विक्री होत आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल ९३ रुपये प्रति लीटर या दराने मिळत आहे. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात पेट्रोल शंभरच्या नजीक पोहोचले आहे. आजही सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळाला नाही. कारण, आज सरकारी तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत १५ ते ३१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. मे महिन्यातही इंधनाच्या दरात वाढ सुरू आहे.

Advertisement

करोना संकट काळात इंधनाच्या दरात वाढ होत आहे. राज्य आणि केंद्र सरकारांकडून इंधनावर कर घेतला जात असल्यानेही इंधनाच्या किमती देशात वाढत आहेत. या मुद्द्यावर विरोधी पक्ष केंद्र व राज्य सरकारवर टीका करत आहेत. इंधनाचे दर कमी करण्याची मागणी करत आहेत. मात्र, सरकारांना याद्वारे घसघशीत महसूल मिळत असल्याने सरकारकडून याबाबत काहीच निर्णय घेतला जात नाही. संकट असो की नसो, इंधनाचे दर शक्यतो कमी झाल्याचे दिसत नाहीत. काही वेळेस दर कमी केले तरी काही दिवसांतच पुन्हा वाढवले जातात, असा अनुभव आहे. आता तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वेगाने वाढ होत आहे. देशातील काही शहरात पेट्रोलने शंभरचा आकडाही पार केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply