Take a fresh look at your lifestyle.

निष्काळजीपणामुळे बसलाय झटका; पण ‘हे’ न केल्यास ६-८ महिन्यांनी कोसळणार यापेक्षाही मोठे संकट

मुंबई : भारतात करोना पळून गेल्याच्या घोषणाबाजीवर फोकस केल्याने देशभरात दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या फोफावल्याचे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अहवालातून स्पष्ट झालेले आहे. मात्र, तरीही केंद्र आणि राज्य सरकार यावर फोकस करण्याऐवजी एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. आता यापुढेही असाच निष्काळजीपणा केल्यास मोठे संकट येईल. त्यामुळे पुढील सहामाहीत लसीकरण उरकून घेण्याचे आवाहन संशोधकांनी केले आहे.

Advertisement

आयआयटी हैदराबादचे प्राध्यापक एम. विद्यासागर यांनी लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला नाही व निष्काळजीपणा केल्यास देशात ६ ते ८ महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट येईल, असा इशारा दिला आहे. तर, केंद्राचे सल्लागार के. विजयराघवन यांनीही जसजसा विषाणू स्वरूप बदलेल, तिसऱ्या कोरोना लाटेचा धोका वाढेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

Advertisement

लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासह कोरोना नियंत्रणासाठीच्या नियमांचे पूर्णपणे पालन करावे लागेल. तेव्हाच कोरोनाची तिसरी लाट रोखता येईल असेही संशोधकांनी म्हटले आहे. प्रा. विद्यासागर सूत्र मॉडेलद्वारे संसर्गाच्या चढ-उताराचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इटलीतील सॅन रॅफेल रुग्णालयातील संशोधकांच्या शोधाचा हवाला देऊन त्यांनी म्हटले आहे की, कोरोनातून बरे झाल्यानंतर ८ महिने रक्तात अँटिबॉडीज असतात. त्यानंतर अँटिबाॅडी घटणे सुरू होते. त्याचा परिणाम शरीराच्या प्रतिकारशक्तीवर होतो. अशावेळी पुन्हा एकदा संक्रमण होण्याचा धोका वाढतो.

Advertisement

संपादन : संतोष शिंदे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply