Take a fresh look at your lifestyle.

जास्त टीव्ही पाहताय का तुम्ही? मग वाचा त्याचे नेमके कसे आणि किती आहेत दुष्परिणाम

आजच्या जमान्यात टीव्ही नाही असे घर लवकर सापडणारच नाही. कारण, आज घराघरात टीव्ही पोहोचला आहे. करमणुकीचे साधन म्हणून तसेच निवांतपणा म्हणून टीव्ही पाहिला जातो. आता तर स्मार्ट टीव्ही आले आहेत. त्यामुळे तासनतास टीव्ही पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, सतत टीव्ही पाहिल्यामुळे त्याचा काय परिणाम होतो, याचा आपण कधी विचार केला आहे का ? याचे उत्तर बहुधा नाही असेच मिळते. कारण याबाबत फारसा विचार कुणीच करत नाही. असे असले तरी याचे उत्तर आता शोधण्यात आले आहे. सतत टीव्ही पाहिल्याने त्याचा शरीरावर अत्यंत घातक परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.

Advertisement

सतत टीव्ही पाहिल्याने त्याचा परिणाम मेंदूवर होण्याची सर्वाधिक शक्यता असते. स्मरणशक्ती व विचार करणे आणि समजून घेण्याची शक्ती सुद्धा यामुळे कमी होऊ शकते. सतत टीव्ही पाहिल्याने माणसांच्या शरीराची हालचाल होत नाही आणि याचा परिणाम थेट मेंदूवर होऊ शकतो, असा दावा अल्बामा युनिवर्सिटीच्या वैज्ञानिकांनी आपल्या अभ्यासाद्वारे केला आहे. वैज्ञानिकांनी यासाठी एक रिसर्च केला होता. यामध्ये ५० ते ७० वर्षे वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. या रिसर्चमध्ये सतत टीव्ही पाहण्याचा मेंदूवर काय परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यात आला.

Advertisement

४५ ते ६४ वर्षे वयात जर टीव्ही पाहण्याच्या सवयीवर नियंत्रण ठेवले तर मेंदू स्वस्थ राहू शकतो. रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या १० हजार ७०० लोकांच्या मेंदूचे स्कॅन करण्यात आले. टीव्ही कधी आणि कोणत्या वेळी पाहता, यांसारखे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यानंतर या अभ्यासात असे दिसून आले, की ७० वर्षे वयात जास्त वेळ टीव्ही पाहणाऱ्या लोकांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता ६.९ टक्क्यांनी कमी झाली आहे.

Advertisement

या अभ्यासातून असे निष्कर्ष समोर आले आहेत. मानवी मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीने यावर विचार करण्याची गरज आहे. तसेही टिव्ही जास्त वेळ पाहिला तर त्यातून फायद्याऐवजी नुकसानच जास्त होणार आहे. असेच या रिसर्चमधूनही दिसून येत आहे. टीव्ही जास्त पाहिल्याने डोळ्यांनाही त्रास होतोच. आता तर करोना संकटाच्या काळात लॉकडाउन आणि कडक निर्बंधांमुळे लोकांना घराबाहेर पडता येत नाही. त्यामुळे करमणूक म्हणून टीव्ही पाहण्याचे प्रमाण वाढले आहे. घरातील मोठ्या सदस्यांप्रमाणेच लहान मुलेही तासनतास टिव्ही  पाहत असतात. असे असले तरी टीव्ही सतत पाहण्याचेही नुकसानही आहे. त्यामुळे आता याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply