Take a fresh look at your lifestyle.

करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लढण्यासाठी भारताने केलीय ‘ही’ तयारी; पाहन काय म्हटलेय आरोग्यमंत्र्यांनी

दिल्ली : करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशात हाहाकार उडाला आहे. अजूनही लाखोंच्या संख्येतच रुग्ण आढळत आहेत. मृत्यूचा दरसुद्धा वाढला आहे. या घातक विषाणूस रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. या मुद्द्यावर आज केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशातील ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांकडून राज्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला.

Advertisement

या बैठकीत त्यांनी करोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतही भाष्य केले. हर्षवर्धन म्हणाले, की देशात करोनाची तिसरी लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, ही लाट केव्हा येणार याबाबत काहीच सांगता येत नाही. या लाटेत लहान मुलांना धोका असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुलांच्या सुरक्षिततेचा विचार करुन मुलभूत व्यवस्थांचे नियोजन करणे आवश्यक आहे.

Advertisement

देशात करोना प्रतिबंधक लसीकरणात वाढ करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आता प्रयत्न करायला हवेत. येत्या काही महिन्यात लस उत्पादन मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. करोनाच्या रुग्णसंख्या आता काही प्रमाणात घट होत असतानाच काळ्या बुरशीच्या आजाराचे नवेच संकट आले आहे. अनेक राज्यात या आजाराचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे. राज्यांना पत्र पाठवून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे काही राज्यांनी या आजारास महामारी घोषित केले आहे. या आजारावरील औषधांचे उत्पादन वाढवण्यात येत आहे. तसेच या आजाराबाबत माहिती राज्यांनी केंद्र सरकारला माहिती द्यावी, असे आदेश देण्यात आल्याचे हर्षवर्धन यांनी सांगितले.

Advertisement

करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर काहीसा कमी होताना दिसत आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र वाढत्या मृत्यू दराने टेन्शन वाढवले आहे. रुग्णसंख्या कमी होत असली तरी अजूनही दररोज दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात संक्रमण वेगाने होत आहे. या विषाणूस रोखण्यासाठी राज्य सरकारे प्रयत्न करत आहेत. लॉकडाउन आणि निर्बंध कडक केल्याने या आजारास काही प्रमाणात आटोक्यात आणण्यात यश मिळाले आहे. मात्र, अजूनही धोका कायम आहे. त्यामुळे आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. केंद्र सरकारकडूनही नियमित माहिती घेण्यात येत आहे. तसेच आवश्यक निर्णय घेण्यात येत आहेत. आता तर तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेऊन राज्यांकडून नियोजन करण्यात येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply