Take a fresh look at your lifestyle.

अखर्चित निधीबाबत नागरी स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेत ‘हे’ महत्वाचे निर्देश..!

पुणे : केंद्र आणि राज्य सरकार विकासाच्या विविध योजनांसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी देत असतात. काही वेळेस निधी देण्यास उशीर होतो तर काही वेळेस मात्र वेळेवर निधी दिला जातो. निधी खर्च करण्यासाठी मुदतही निश्चित करुन देण्यात येते. मात्र, तरी सुद्धा सरकारी कामकाजात उशीर होतोच. हे आता नेहमीचेच झाले आहे. निधी मिळाल्यानंतरही प्रशासकीय पातळीवरील कामकाज आणि अन्य कारणांमुळे निधी वेळेत खर्च करता येत नाही. कोट्यावधींचा निधी अखर्चित राहतो. हा अखर्चित निधी खर्च करण्यासाठी वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येते.

Advertisement

आताही नगर विकास विभागाने सन २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० या आर्थिक वर्षांतील अखर्चित असलेला निधी खर्च करण्यासाठी २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. राज्यातील नागरी स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थांनी या मुदतीत अखर्चित निधी खर्च करण्याचे आदेश विभागाने दिले आहेत.

Advertisement

आता या मुदतीत हा निधी खर्च करावा लागणार आहे. तसे पाहिले तर अखर्चित निधीबाबत नेहमीच तक्रारी केल्या जातात. निधी अखर्चित राहण्यामागेही अनेक कारणे असतात. कधी प्रशासकीय पातळीवर कामकाज वेळेवर होत नाही. तर कधी कामकाजासाठी आवश्यक असणारी मंजुरी वेळोवर मिळत नाही. वर्षानुवर्षी फाइल पुढे सरकत नाही. तर कधी वेळेवर निर्णय घेतले जात नाहीत, अशा अनेक समस्या निर्माण होत असल्याने निधी अखर्चित राहतो. याचा फटका मात्र विकासकामांना बसत आहे. निधी असतानाही गावांचा विकास वर्षानुवर्षे रखडतो. साध्या रस्त्याचे बांधकाम करायचे म्हटले तरी त्यास वर्षानुवर्षे वाट पहावी लागते. निवडणुकांतही या मुद्द्यावर जोरदार चर्चा होत असते. पण प्रत्यक्षात मात्र निधी मिळत असतानाही हा निधी वेळेत खर्च का होत नाही, गावात, शहरात विकासाची कामे का रखडतात, यामागची कारणे वेगळीच असतात.

Advertisement

दरम्यान, राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती या नागरी स्वराज्य संस्थांचा मागील चार वर्षातील निधी अखर्चित आहे. हा निधी खर्च करणे आवश्यक आहे. त्यामुळे निधी खर्च करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या काळात हा निधी खर्च करण्याची जबाबदारी या संस्थांची आहे. या मुदतीतही जर निधी खर्च करता आला नाही तर असा अखर्चित निधी राज्य सरकारकडे जमा करावा लागणार आहे. निधी खर्च करण्यातील मागील अनुभव पाहता निदान आता तरी हा अखर्चित निधी खर्च केला जाणार का, हा मोठा प्रश्न आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply