Take a fresh look at your lifestyle.

म्हणून त्यांनी जाळले करोना लसचे तब्बल 17 हजार डोस; पहा काय आहे कारण

दिल्ली : जगभरात करोना लसीकरण करण्यात अडथळे येत आहेत. अगदी उत्पादक देश असलेल्या भारतामध्येही लसीकरण सुरळीत होऊ शकलेले नाही. एकाएका लससाठी संघर्ष चालू आहे. त्याचवेळी एखाद्या ठिकाणी तब्बल 17 हजार लस जाळून टाकण्याची बातमी नक्कीच मनाला त्रास देणारी आणि संतापाची आहे. मात्र, त्याला दुसरा पर्याय नसल्यावर काय होणार म्हणा.

Advertisement

आफ्रिकेच्या मलावी या देशात मुदत संपलेल्या कोरोना व्हायरस अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसच्या 17 हजार डोसांला आग लावावी लागली आहे. बीबीसीच्या वृत्तानुसार, मलावी हा असा पहिला आफ्रिकन देश आहे. एप्रिलमध्ये एक्स्पायर झालेले डोस येथे जाळण्यात आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी देशांना असे न करण्यास सांगितले होते. पण नंतर त्यांचा सल्ला बदलला आणि या लस जाळण्यात आल्या.

Advertisement

Hon Khumbize Kandodo Chiponda MP on Twitter: “Many thanks to the Media, Anti Corruption Bureau, National Audit Office, Malawi Police for witnessing the counting of the expired vaccine vials, loading of the same vials into the incinerator and then the setting ablaze of the vials https://t.co/hrXkQcDvQ5” / Twitter

Advertisement

मलावी येथील अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, लोकांमध्ये अशी शंका होती की त्यांना कालबाह्य झालेली लस तर दिली जात जात नाही ना. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. या देशाला लस सामायिकरण सुविधेअंतर्गत 3 लाख डोस देण्यात आलेले आहेत. भारतातूनही त्यांना 50 हजार डोस देण्यात आले. परंतु, लोक लस घेण्यासाठी येथे वेळेवर पोहोचले नाहीत आणि मग कालबाह्य झालेल्या लस जाळाव्या लागल्या आहेत.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply