Take a fresh look at your lifestyle.

White fungus : पांढरी बुरशीही आहे घातक; पण पहा कशा पद्धतीने आपण यावर करू शकतो मात

दिल्ली : अवघा देश सध्या काळ्या म्यूकरमाइकोसिस नावाच्या बुरशीजन्य रोगावर चर्चा करीत असतानाच आता बिहारमध्ये चार पांढऱ्या बुरशीचे रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. पांढर्‍या बुरशीला काळ्या बुरशीपेक्षा जास्त धोकादायक मानले जाते. मात्र, यावरही उपचार उपलब्ध आहे. त्यासाठी याचे वेळीच निदान होऊन उपचार सुरू होणे आवश्यक आहे. बिहारमध्ये चारही रुग्ण अँटि फंगल औषधानं हे रुग्ण बरे झालेले आहेत.

Advertisement

पांढर्‍या बुरशीबद्दल बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे म्हणाले की, या तांत्रिक गोष्टी आहेत ज्याचे विश्लेषण केवळ डॉक्टर आणि तज्ज्ञच करू शकतात. शुक्रवारी मायक्रोबायोलॉजिस्टशी बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती मगच मिळू शकेल. पटना येथील पांढर्‍या बुरशीने संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी एक सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख डॉ. एस.एन. सिंह यांनी याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, पांढर्‍या बुरशीचे चार रुग्ण आढळले आहेत. ज्यांचे आजाराचे लक्षण कोरोनासारखे होते. परंतु त्यांना कोरोना नव्हे तर पांढर्‍या बुरशीचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

फुफ्फुसांमध्ये संसर्ग होत असल्याने पांढऱ्या बुरशीला जास्त घातक मानले जाते. त्वचा, नखं, तोंडाच्या आतील भाग, आतडे, किडणी प्रायव्हेट पार्ट आणि मेंदू अशा सर्वच अवयवांवर याचा परिणाम होतो. कोरोनासारखी लक्षणं आणि कफमुळं निघणाऱ्या द्रवाच्या तपासणीतून याचे निदान करावे लागते. त्यामुळे निदान करताना जास्त कालावधी जाण्याची शक्यता आहे. धोकादायक असला तरी यापासून बचाव सोपा आहे. ऑक्सिजन सिलिंडरमध्ये ह्युमिडिफायरसाठी स्टर्लाईज वॉटरचा वापर करूनच रुग्णांना प्राणवायू देण्यात यावा. तसेच कॅन्सरच्या रुग्णांनाही या फंगसपासून धोका आहे. नवजात बाळांमध्ये हा आजार डायपर कँडिडोसिस म्हणून ओळखला जातो.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply