Take a fresh look at your lifestyle.

अदर पूनावाला यांनी विकले, ‘सिरम’ने घेतले.., वाचा नेमकं काय झालं..?

मुंबई : कोरोनामुळे ‘सिरम’ कंपनी आणि या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला हे नाव सगळ्या जगाला माहित झाले. तर या पुनावाला यांनी नुकतीच एक गोष्ट विकली होती..विशेष म्हणजे, ती दुसरे-तिसरे कोणी नाही, तर सीरम कंपनीनेच खरेदी केली.. हा नेमका काय प्रकार आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल..! चला तर मग, याबाबत जाणून घेऊ या…

Advertisement

सीरम इंडिया इन्स्टिट्यूटचे (Serum Institute of India) सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांची पॅनासिया बायोटेक (Panacea Biotec) कंपनीत वैयक्तिक 5.15 टक्के हिस्सेदारी होती. हे शेअर्स विकून पुनावाला ‘पॅनासिया बायोटेक’मधून आता बाहेर पडले आहेत. खुल्या बाजारात पुनावाला यांनी विकलेले संपूर्ण शेअर्स ‘सीरम इंडिया इन्स्टिट्यूट’ने खरेदी केले आहेत. ही डील जवळपास 118 कोटी रुपयांना झाली.

Advertisement

मुंबई शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार, पूनावाला यांनी ‘पॅनासिया’तील 31,57,034 शेअर्स 373.85 रुपये प्रति शेअर्स दराने विकले. त्यात त्यांना 118.02 कोटी मिळाले. हे सर्व शेअर्स वेगळ्या ‘डील’मध्ये सीरम इंडिया इन्स्टिट्यूटनेच खरेदी केले आहेत.

Advertisement

‘पॅनासिया’च्या मार्च-2021च्या शेअर्स होल्डिंग आकडेवारीनुसार, पूनावाला आणि सिरम कंपनीने अनुक्रमे 5.15 टक्के आणि 4.98 टक्के शेअर्स खरेदी केले होते. पूनावाला यांनी आपले सर्व शेअर्स विकल्यानंतर आता हे सर्व शेअर्स कंपनीच्या नावे झाले आहेत.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply