Take a fresh look at your lifestyle.

पेटीएमद्वारे भरा क्रेडिट कार्ड बिल, अ‍ॅपवर आलेय हे नवीन फिचर..

नवी दिल्ली : आतापर्यंत पेटीएमकडून (Paytm) क्रेडिट कार्ड बिल (Credit card Bill) भरताना वॉलेटद्वारे (Wallet) पेमेंट करण्याचा कोणताही पर्याय दिलेला नव्हता. परंतु, आता पेटीएम अ‍ॅपद्वारे क्रेडिट कार्ड बिल भरताना यूपीआय (UPI), पेटीएम बँक, डेबिट कार्ड (Debit card) आणि नेटबँकिंग (Netbanking) व्यतिरिक्त पेटीएम वॉलेट बॅलन्सदेखील ऑप्शन असेल. तुमच्या वॉलेटमध्ये पैसे नसल्यास क्रेडिट कार्ड बिल पेमेंट करतेवेळी तुम्ही अॅड मनी करू शकत नाही.

Advertisement

‘पेटीएम’ वर असे भरा क्रेडिट कार्ड बिल

Advertisement
  • सर्वप्रथम ‘पेटीएम’ अ‍ॅप्लिकेशन अपडेट करा.
  • अ‍ॅपवर All Service वर क्लिक करा.
  • यानंतर Monthly Bills वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Credit Card Bill चा ऑप्शन दिसेल.
  • पहिल्यांदाच कार्डचे पेमेंट करणार असाल, तर Pay Bill For New Credit Card वर क्लिक करा.
  • यानंतर कार्ड नंबर अपलोड करून Proceed वर क्लिक करा.
  • आता पेमेंट मोड सिलेक्ट करा. यानंतर पेटीएम वॉलेट बॅलन्स, यूपीआय, पेटीएम बँक, डेबिट कार्ड किंवा नेटबँकिंगच्या माध्यमातून पेमेंट करा. विशेष म्हणजे, वॉलेट बॅलन्सपासून पेमेंट केल्यास कोणतेही एक्स्ट्रा चार्ज लागत नाही.

क्रेडिट कार्ड बिल भरताना सहसा क्रेडिट कार्डचा ऑप्शन उपलब्ध नसतो. परंतु पेटीएमच्या नवीन फीचरमुळे तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे आपले बिलदेखील भरू शकता. यासाठी तुम्हाला आधी आपल्या पेटीएम वॉलेटमध्ये क्रेडिट कार्डद्वारे पैसे भरावे (मनी अ‍ॅड) लागतील.

Advertisement

दरम्यान, क्रेडिट कार्डसह वॉलेटमध्ये पैसे भरल्यानंतर 2.07-3.07 टक्के अतिरिक्त शुल्क भरावे लागते. क्रेडिट कार्ड बिल भरताना आता तुम्ही वॉलेट बॅलन्स वापरू शकता.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply