Take a fresh look at your lifestyle.

कोरोना लसीसोबतच जगभर भटकंतीची संधी, जाणून घ्या ‘लस पर्यटन स्किम’बाबत..!

नवी दिल्ली : अवघ्या जगाला सध्या कोरोना संकटाने घेरलेले आहे. कोरोना लसीकरण सुरू असली, तरी त्याला म्हणावी तितकी गती मिळालेली नाही. सरकार नागरिकांना घरातच बसण्याचे आवाहन करीत आहे. मात्र, अशा संकट काळात एका पर्यटन कंपनीने चक्क लस पर्यटन स्किम आणली आहे. काय आहे ही योजना, तिचा कुणाला लाभ घेता येईल, याबाबत जाणून घेऊ या..

Advertisement

देशात सध्या मोठ्या प्रमाणात लसींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारून नागरिक वैतागले आहेत. ज्यांच्याकडे पैसा आहे, अशा नागरिकांचा परदेशात जाऊन लस घेण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळेच दुबईतील एका पर्यटन कंपनीने एक ‘टूर पॅकेज’ जाहीर केले आहे. त्यात 24 दिवसांसाठी रशियाची सहल आणि स्पुटनिक-व्ही लसीच्या दोन डोसचा समावेश आहे. या सहलीसाठी प्रति व्यक्ति 1 लाख 30 हजार रुपये खर्च येईल, असे कंपनीने जाहीर केले आहे.

Advertisement

सर्व पर्यटकांना मॉस्कोत पोहचल्यानंतर लशीचा पहिला डोस देण्यात येईल. जवळपास 28 पर्यटकांची एक बॅच 29 मे रोजी रवाना होणार आहे. त्यापुढची बॅच 7 जून आणि 15 जून रोजी काढण्याचे प्रस्तावित असल्याचे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Advertisement

30 पर्यटकांची एक बॅच, याप्रमाणे लस पर्यटन केले जाणार आहे. या योजनेत दिल्ली-मास्को-दिल्ली हवाई प्रवासाचे तिकिट, पीट्सबर्ग येथे 4 दिवस थ्री-स्टार हॅाटेलात निवास, 20 दिवस मास्कोतील थ्री-स्टार हॅाटेलातील निवास, तसेच ब्रेकफास्ट, डिनर आणि पर्यटनस्थळांच्या भ्रमंतीचा समावेश आहे. फक्त व्हिसाचे शुल्क पर्यटकांना भरावे लागेल, असे कंपनीच्या अधिका-याने सांगितले.

Advertisement

व्हॅक्सिनचा डोस घेण्यासाठी सध्या रशियाने भारतीयांना त्यांच्या देशात येण्यास परवानगी दिलेली आहे. येथे जाण्यासाठी केवळ PCR चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असण्याची अट आहे. सर्वप्रथम दुबईने लसीकरण पर्यटन ही संकल्पना राबवली आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply