Take a fresh look at your lifestyle.

यु-ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून नितीन गडकरींचीही दणकून कमाई; पहा महिन्याला किती कमावतात पैसा..?

मुंबई : मीडिया क्षेत्रात अनेक नवनवे बदल होत आहेत. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात होणाऱ्या बदलातून सध्या डिजिटल माध्यमात क्रांतिकारी बदल झाले आहेत. ऑनलाइन जर्नालिझम जोरात सुरु आहे. त्या माध्यमातून मोठी कमाईदेखील होत आहे. कोरोना काळात तर अनेकांनी घरबसल्या स्वतःचे न्यूज पोर्टल, यु-ट्युब चॅनेल सुरु केले. त्यात आपले राजकीय नेतेही मागे नाहीत. ‘रोडमॅन’ अशी ओळख झालेल्या, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही मोठे ‘टेक्नोसॅव्ही’ असून, यु ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून मोठी कमाई होत असल्याचे त्यांनी नुकतेच सांगितले होते.

Advertisement

राष्ट्रीय स्तरावर भाजप नेते नितीन गडकरी नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांचे यू-ट्युबवरील (Youtube) एक भाषण चांगलेच गाजत आहे. त्यात कोरोना काळात आपल्या जीवनात कसे बदल झाले, याबाबत गडकरी यांनी सांगितले आहे. ते म्हणतात, “कोरोनाच्या काळात मी ‘टेक्नोसॅव्ही’ (Techno savvy) होण्यासाठी काही पाऊले उचलली. यू-ट्युब चॅनेलवर सक्रिय झालो. त्यातून आता महिन्याकाठी मला जवळपास 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.”

Advertisement

ट्विटरवर गडकरी यांच्या फॉलोअर्सची (Followers) संख्याही तब्बल 1 कोटी 20 लाख इतकी झाली आहे. कोरोना काळात माझ्या जीवनात काही चांगल्या गोष्टी घडल्या. मला सकाळी आणि संध्याकाळी चालण्याची सवय लागली. या काळात मी भगवदत गीताही ऐकायला लागलो. आयुष्यात मला पहिल्यांदाच गीतेचे 10 अध्याय, त्याचे विवेचन शांतपणे ऐकण्याची संधी मिळाली. माझ्यादृष्टीने ही खूप मोठी गोष्ट असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.

Advertisement

एक जुनी आठवण संतना गडकरी म्हणाले की “ऐंशीच्या दशकात लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी हेदेखील पराभूत झाले होते. तो काळ आमच्यासाठी प्रचंड निराशेचा होता. अनेक जण या पक्षाला भविष्य नाही, तू चांगला आहे, पण या पक्षात तुझे काही होणार नाही, असे सांगत होते. तेव्हा मीदेखील या गोष्टीवर खूप विचार केला. मात्र, हा पक्ष माझ्या विचारांचा होता. त्यामुळे काहीही झाले, तरी हा पक्ष सोडणार नाही, हे मी तेव्हाच ठरवले होते.”

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply