Take a fresh look at your lifestyle.

कोविड लसीकरण : मनमोहन सिंग-गडकरी फॉर्म्युल्यावर मोदी सरकारच्या निर्णयाकडे लागले देशाचे लक्ष

पुणे : सध्या देशभरात करोना विषाणूवर मात करण्याच्या कामात औषधांची कमतरता, ऑक्सिजन टंचाई, बनावट औषधे आणि अपुऱ्या प्रमाणात होत असलेला लस पुरवठा हेच महत्वाचे प्रश्न आहेत. मात्र, त्यावर ठोस तोडगा काढण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला यश आलेले नाही. अशावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि त्यांच्यानंतर आता मोदी सरकारचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोपा आणि वेगळा फॉर्म्युला सांगितला आहे. त्यावर केंद्र सरकार कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

डाॅ. मनमाेहन िसंग यांनी १८ एप्रिलला सुचवले होते की, जास्तीत जास्त कंपन्यांना लस निर्मितीचा परवाना देण्याची कार्यवाही करावी. याद्वारे उत्पादन वाढवून पुरवठा सुरळीत करावा. त्याचाच पुनरुच्चार आता स्वदेशी जागरण मंचाच्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. एकाच कंपनीऐवजी १० कंपन्यांना लसनिर्मितीचा परवाना दिल्यास पुरवठ्यातील अडचणी दूर होतील असा सल्ला गडकरी यांनी दिला आहे. अनेकांनी गडकरी यांच्या या सल्ल्याला पाठींबा दिला आहे.

Advertisement

गडकरींनी म्हटले आहे की, लस तयार करण्यासाठी एकाऐवजी १० कंपन्यांना परवाना द्यावा आणि त्याची रॉयल्टीही घ्यावी. प्रत्येक राज्यात २-३ प्रयोगशाळा आहेत. त्यांच्याकडे लसनिर्मितीची क्षमताही आहे. फॉर्म्युला देऊन त्यांच्याकडून लस तयार करून शक्य होईल. मग देशासाठी लागणाऱ्या लस सोडून लसचे अतिरिक्त उत्पादन झाल्यास लसींची निर्यात करता येईल. यावर काँग्रेस नेते व राज्यसभा खासदार जयराम रमेश म्हणाले आहेत की, ‘मात्र तुमचे (गडकरी) बॉस ऐकत आहेत का? हेच तर डाॅ. मनमाेहन िसंग यांनी १८ एप्रिलला सुचवले होते.’

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply