Take a fresh look at your lifestyle.

Covid-19 Vaccine : ‘त्या’ दोन्ही लसचे कॉकटेल आहे बेस्ट; पहा काय म्हटलेय संशोधकांनी

पुणे : सध्या अनेकांना लसचा एक डोस घेतल्यावर दुसरा डोस मिळताना अनेक अडचणी येत आहेत. लस उत्पादन आणि मागणी याचा ताळमेळ नसल्याने असे होत आहे. अशावेळी आता दोन वेगवेगळ्या कंपन्यांच्या लस घेणे म्हणजे लसचे कॉकटेल हा नवाच मुद्दा पुढे आलेला आहे. त्यातील काही लसचे निष्कर्ष बेस्ट आल्याने करोनाविरुद्धच्या लढाईस आणखी बळ मिळाले आहे.

Advertisement

करोना लस ही आता आयुष्याचा एक महत्वाचा घटक बनली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांच्या मनातही लसबद्दल अनेक प्रश्न आहेत. असाच एक प्रश्न आहे की एखाद्या व्यक्तीला दोन वेगवेगळ्या लस लागू करता येतात का? तर यावरही स्पेन देशातील विद्यापीठाने अभ्यास केला आहे. त्यानुसार, अ‍ॅस्ट्रॅजेनेका (AstraZeneca) आणि फायझर (Pfizer) लस यांचे संयोजन (कॉकटेल) पूर्णपणे सुरक्षित आहे. रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आणि प्रतिबंधित करण्यासाठी हे प्रभावी असल्याचे इंडियन एक्सप्रेसच्या बातमीत म्हटले आहे.

Advertisement

स्पेनमधील कार्लोस III या आरोग्य संस्थेने केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या पहिल्या डोसनंतर फायजरचा दुसरा डोस घेणे पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. क्लिनिकल चाचण्यांचे निकाल विद्यापीठाने दिले आहेत. ज्यामध्ये 60 वर्षांखालील 673 लोकांनी भाग घेतला. सुमारे 6 आठवड्यांपूर्वी सर्व 673 लोकांना अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसचा पहिला डोस देण्यात आला. क्लिनिकल चाचणी दरम्यान यापैकी फ़क़्त 441 लोकांना फाइझर लसचा दुसरा डोस देण्यात आला. तर 232 सहभागींना दुसरा डोस देण्यात आला नाही आणि नियंत्रण गट म्हणून उपचार केले गेले.

Advertisement

त्यातून आश्चर्यचकित करणारे रिझल्ट मिळाले आहेत. संशोधकांना असे आढळले की, ज्या लोकांना फायजर लसचा दुसरा डोस दिला गेला होता त्यांच्यात रक्तामध्ये अ‍ॅस्ट्रॅजेनेकाचा एक डोस दिला गेलेल्यांपेक्षा 30-40 पट इतक्या जास्त एंटीबॉडी आढळल्या. ज्यांना फाइझरचा दुसरा डोस दिल्यावर न्यूट्रलाइजिंग एंटीबॉडी सातपट जास्त आढळल्या आहेत.

Advertisement

अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसचे दोन्ही डोस प्राप्त झालेल्या लोकांमध्ये एंटीबॉडी केवळ दुप्पट होते. याचा अर्थ असा आहे की अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि फायझर लस एकत्र केल्याने लोकांमध्ये रोगाविरूद्ध लढण्याची क्षमता वाढवते.

Advertisement

संपादन : विनोद सूर्यवंशी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply