Take a fresh look at your lifestyle.

‘त्यावेळी’ मिळणार सर्वांना लस; पहा भाजप अध्यक्ष नड्डा यांनी काय वेळापत्रक सांगितलेय

दिल्ली : देशात करोना विषाणूचे संकट कायम आहे. या काळात केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. करोनाच्या प्रत्येक मुद्द्यावर वाद होताना दिसत आहे. करोना प्रतिबंधक लसींच्या कमतरतेच्या मुद्द्यावरील वाद अजूनही थांबलेला नाही. काँग्रेसकडून केंद्र सरकारावर आरोप होत आहेत. यावर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले आहे, की काँग्रेस जनतेत संभ्रम निर्माण करुन भिती पसरवत आहे. येत्या डिसेंबरपर्यंत देशातील सर्वांना करोना प्रतिबंधक लस उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी वेळ निश्चित करण्यात येत आहे.

Advertisement

देशभरातील भाजप खासदारांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे नड्डा यांनी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी करोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत काही मुद्दे स्पष्ट केले. तसेच काँग्रेसवरही जोरदार टीका केली. करोनाच्या संकटकाळात देशात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेची सेवा करत आहेत. काँग्रेस मात्र जनतेत संभ्रम निर्माण करुन भिती पसरवत असल्याची टीका नड्डा यांनी केली.

Advertisement

देशात करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. देशातील १८ कोटींपेक्षा जास्त नागरिकांना लस देण्यात आली आहे. याबाबत नियोजन सुरू आहे. डिसेंबरपर्यंत देशातील सर्वांना लस दिली जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Advertisement

देशात सध्या करोना प्रतिबंधक लसीकरण अत्यंत धिम्या गतीने होत आहे. लसींची कमरतरता असल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. लसींअभावी १८ ते ४४  वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणासही झटका बसला आहे. या पद्धतीने लसीकरण होत राहिल्यास सर्वांना लस देण्यास बराच काळ लागेल. त्यामुळे लसीकरण वेगाने होणे आवश्यक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लसी वेळेवर मिळत नसल्यानेच लसीकरणात अडचणी येत असल्याच्या तक्रारी होत आहेत. केंद्र सरकारने मात्र या तक्रारीत तथ्य नसल्याचे म्हटले आहे. राज्यांकडे पुरेशा प्रमाणात लसी असल्याचा दावा सरकारने केला आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply