Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ शेअरमध्ये मिळू शकतात 35 टक्क्यापर्यंत रिटर्न; पहा नेमके काय म्हणतायेत सल्लागार

पुणे : सध्याचा कालावधी हा अनेक कंपन्यांसाठी बिकट आहे. एकीकडे अर्थव्यवस्था रसातळाला असताना अनेक शेअर तरीही उच्चांकी घोडदौड करीत आहेत. करोना संकट संपत (Coronavirus In India) नसल्याने बाजारात पुढे काय होणार, याच धास्तीत सगळे आहेत. अशावेळी कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करावी याचीच गुंतागुंत वाढली आहे. मात्र, अनेक ब्रोकरेज हाउसना बँकिंग सेक्टरमधील (return on banking stocks) गुंतवणूक सुरक्षित वाटत असून वर्षभरात 35 टक्क्यांपर्यंत रिटर्न (High Return Giving Shares) देतील असेही त्यांना वाटते.

Advertisement

सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेत बँक निफ्टी यामध्ये तब्बल 11 टक्के इतके करेक्शन पाहायला मिळालेले आहे. त्याचवेळी चांगल्या बँकांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यावर वर्षभरात 15 ते 35 टक्के इतकी वाढ मिळण्याची शक्यता अनेकांना वाटत आहे. एम्के ग्लोबलचे विश्लेषक आनंद दामा यांचे म्हणणे आहे की,आयसीआयसीआय, एसबीआय आणि अ‍ॅक्सिस बँक यासारख्या समभागांमध्ये गुंतवणूक फायदेशीर होऊ शकते. इंडसइंड बँक आणि बंधन बँक हे समभागही उत्कृष्ट परतावा मिळविण्यासाठी चांगले ठरू शकतात.

Advertisement

बी अँड के सिक्युरिटीजचे विश्लेषक जय मुंद्रा यांचे म्हणणे आहे की, पहिल्या लाटेच्या तुलनेत बँकांची परिस्थिती यावेळी चांगली आहे. आयसीआयसीआय, एसबीआय, अ‍ॅक्सिस बँक आणि एचडीएफसी बँक यासारख्या समभागांमध्ये गुंतवणूक करून 25-30 टक्के परतावा मिळण्याची अपेक्षा आहे.

Advertisement

ता. क. : बाजारामध्ये पैसे गुंतवणूक, त्याद्वारे नफा मिळवणे आणि तोटा होण्यासाठी खूप साध्या आणि छोट्या गोष्टीही परिणामकारक ठरू शकतात. त्यामुळे गुंतवणूक करताना स्वतः अभ्यास करून आणि आडाखे बांधून याबाबत निर्णय घ्यावा.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply