Take a fresh look at your lifestyle.

म्हणून इलेक्ट्रॉनिक कंपन्यांनी बंद केलेय भारतासाठीचे उत्पादन; हजारो कोटींचा बसलाय फटका

मुंबई : देशातील मोठ्या इलेक्ट्रॉनिक आणि स्मार्टफोन कंपन्यांनी देशांतर्गत बाजारासाठीचे उत्पादन बंद केले आहे. देशात कोरोनाव्हायरसची दुसरी लाट सुरू आहे आणि हा प्रकोप रोखण्यासाठी अनेक राज्यांमध्ये स्थानिक स्तरावर लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक वस्तू सोडून इतर वस्तूंच्या ऑनलाईन विक्रीवरही बंदी घातली आहे. परिणामी देशात इलेक्ट्रॉनिक वस्तू व स्मार्टफोनची विक्री जवळपास ठप्प झाली आहे. त्यामुळे असा निर्णय झाला आहे.

Advertisement

बर्‍याच कंपन्यांमध्ये काम करणारे कर्मचारीही कोरोनामुळे बाधित झाल्याने सगळीकडे असुरक्षित भावना असल्याचा परिणामही झाला आहे. त्यामुळे एलजी, पॅनासोनिक, कॅरियर मीडिया, व्हिवो, ओप्पो, हाययर आणि गोदरेज अप्लायन्सेस यासारख्या अनेक कंपन्यांनी आपले सर्व प्लांट बंद केले आहेत किंवा उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी केले आहे. अॅपल आणि सॅमसंग सारख्या कंपन्याही केवळ जागतिक बाजारपेठेत पाठवण्यासाठी उत्पादन करीत आहेत. या कंपन्या केवळ 25 ते 40 टक्के क्षमतेसह कार्यरत आहेत.

Advertisement

सॅमसंगचे अनेक प्लांट आठवड्यातून तीन दिवस बंद असतात. उर्वरित दिवसांमध्येदेखील नियमांचे पालन करून उत्पादन करताना फारच कमी प्रोडक्शन होत आहे. एलजी कंपनीदेखील केवळ निर्यातीसाठीच उत्पादन करत आहे. गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख कमल नंदी म्हणाले की, स्थानिक लॉकडाऊन आणि निर्बंधामुळे केवळ 15 टक्के बाजारपेठा खुली आहेत. स्टोअरसाठी मर्यादित वेळ दिली गेली आहे. सध्या केवळ 5 ते 6 टक्के विक्री केली जात आहे. फ्रीजची विक्री होऊ शकलेली नाही. तब्बल 10 हजार कोटी रुपयांचा फटका यामुळे कंपन्यांना बसला आहे.

Advertisement

नंदी हे ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणे असोसिएशनचे (CEAMA) अध्यक्ष आहेत. ते म्हणाले की, सध्या उत्पादन करणे हेच कामगारांच्या जीवाला धोकादायक ठरत नाही. जवळपास सर्व ब्रांड्सने त्यांचे प्लांट देखभालीसाठी बंद केली आहेत. बाजार सुरळीत झाल्यावरच उत्पादन सुरू करण्याचा निर्णय अनेकांनी घेतला आहे. पॅनासॉनिक इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष शर्मा म्हणाले की, कंपनी बाजारातील परिस्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. त्यानुसार मागणी आणि सुरळीतपणे पुरवठा करणे शक्य झाल्यावरच उत्पादन पुन्हा सुरू केले जाईल. बर्‍याच कंपन्यांकडे महिन्यापेक्षा जास्त वस्तूंचा माल असतो.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply