Take a fresh look at your lifestyle.

आय्योव.. फ़क़्त काळी नाही तर पांढरी बुरशीही आलीय; पहा नेमके काय आहेत लक्षणे आणि परिणाम

दिल्ली : आपण करोना आणि म्यूकरमाइकोसिस नावाच्या काळ्या बुरशीबरोबर लढण्यासाठी तयार असतानाच आता पांढऱ्या बुरशीने डोके वर काढले आहे. या बुरशीजन्य रोगाचे काही रुग्ण बिहार राज्यात सापडले असल्याची बातमी अनेक वृत्तपत्रांनी दिली आहे. आता या नव्या संकटाशी आपल्याला दोन हात करावे लागणार आहेत.

Advertisement

पांढर्‍या बुरशीला काळ्या बुरशीपेक्षा जास्त धोकादायक मानले जाते. पाटण्यातील पांढर्‍या बुरशीने संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी एक पाटणा येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आहेत. मीडिया रिपोर्टनुसार पटना मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमधील मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख डॉ. एस.एन. सिंह यांनी याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, पांढर्‍या बुरशीचे चार रुग्ण आढळले आहेत. ज्यांचे आजाराचे लक्षण कोरोनासारखे होते. परंतु त्यांना कोरोना नव्हे तर पांढर्‍या बुरशीचा संसर्ग झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

पांढर्‍या बुरशीबद्दल बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडे म्हणाले की, या तांत्रिक गोष्टी आहेत ज्याचे विश्लेषण केवळ डॉक्टर आणि तज्ज्ञच करू शकतात. शुक्रवारी मायक्रोबायोलॉजिस्टशी बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या प्रकरणाची संपूर्ण माहिती मगच मिळू शकेल. दरम्यान, बुधवारी पाटण्यातील प्रमुख सरकारी रुग्णालयात काळ्या बुरशीच्या म्यूकर्मायकोसिसचे एकूण 34 नवीन रुग्ण तपासणीसाठी दाखल झाले आहेत. एम्स येथे दाखल झालेल्या 24 पैकी सात जणांना उपचारासाठी दाखल केले. इतरांना तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याच वेळी, आयजीआयएमएसमध्ये आलेल्या सर्व नऊ लोकांना ब्लॅक फंगस युनिटमध्ये दाखल केले गेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply