Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदी मार्केट : म्हणून दरवाढीस लागला ब्रेक; पहा काय आहेत आजचे बाजारभाव

दिल्ली : करोना संकटात सुरक्षित गुंतवणूक म्हणून नागरिकांनी सोने खरेदीस प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ झाली होती. परिणामी काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ सुरू होती. आज मात्र या दरवाढीस ब्रेक लागला आहे. आज गुरुवारी सोने आणि चांदीच्या दर कमी झाले आहेत. याआधी सोन्याचे भाव ४८ हजार ७०० रुपये प्रति दहा ग्रॅम असे होते. आता मात्र भाव कमी होऊन ४८ हजार ५२० रुपये इतके झाले आहेत. तर चांदीचे दर थोडे कमी झाले आहेत. एक किलो चांदीचे दर ७२ हजार ७३ रुपये असे आहेत

Advertisement

करोनाच्या संकटात सोन्यास मागणी वाढली आहे. याआधी पहिल्या लाटेवेळी देखील अशीच परिस्थिती होती. त्यावेळी तर सोन्याचे भाव ५० हजारांच्याही पुढे गेले होते. यावेळच्या दुसऱ्या लाटेत अद्याप भाव ५० हजारांच्या पुढे गेलेले नाहीत. तरी देखील काही दिवसांपासून सोन्याचे दर मात्र वाढत आहे. या वाढत जाणाऱ्या दरांना आज ब्रेक लागला आहे. सोने आणि चांदीचे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत.

Advertisement

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव ५० हजार ८३० रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. चेन्नईमध्ये ५० हजार १६० रुपये, मुंबईत ४७ हजार रुपये तर कोलकातामध्ये ५० हजार ४७० रुपये असे भाव आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply