Take a fresh look at your lifestyle.

योगींनी केलेय ‘ते’ लक्ष्य सेट; पहा कसा होणार २५.५४ लाख कुटुंबाना फायदा

लखनऊ : स्वतःचे हक्काचे घर असावे असे प्रत्येकालाच वाटते. काही जणांचे घराचे स्वप्न पूर्ण होते मात्र, काही जणांना पैशांअभावी घर घेता येत नाही. देशात अशी कोट्यावधी कुटुंबे आहेत, ज्यांना अजूनही आपले हक्काचे घर मिळालेले नाही. त्यामुळे या घर नसणाऱ्या प्रत्येक कुटुंबास २०२२ पर्यंत घर देण्याचे केंद्र सरकारचे उद्दीष्ट आहे.

Advertisement

उत्तर प्रदेश राज्यात २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अजूनही येथे लाखो कुटुंबांना घर मिळालेले नाही. त्यामुळे या कुटुंबांना निवडणुकी आधी घर मिळावे, यासाठी सरकारने नियोजन केले आहे. सरकारने आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी २५.५४ लाख घरांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे. मे महिन्यापर्यंत या प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी मिळेल, असे सांगितले जात आहे.

Advertisement

उत्तर प्रदेश राज्य मोठे आहे. या राज्याची लोकसंख्या अन्य राज्यांच्या तुलनेत जास्त आहे. त्यामुळे येथे ज्यांना घर नाही त्यांना घर देण्यासाठी सरकारला तारेवरची कसरत करावी लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा २०२२ पर्यंत ज्यांच्याकडे घर नाही अशा प्रत्येक कुटुंबास घर देण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. उत्तर प्रदेशमध्ये आतापर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १४ लाखांपेक्षा जास्त कुटुंबांना घर उपलब्ध करुन दिले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply