Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या गुजरात दौऱ्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी केली गंभीर टीका; पहा काय म्हटलेय त्यांनी

मुंबई : तौक्ते चक्रीवादळाचा फटका देशातील आठ राज्यांना बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र गुजरात राज्याचाच दौरा करत या नुकसानग्रस्त राज्यास एक हजार कोटी रुपये मदतनिधीची घोषणा केली. त्यावरुन राज्यात जोरदार राजकारण सुरू आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री तसेच राजकीय पक्षांचे नेते पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका करत आहे. तर दुसरीकडे भाजपचे नेतेही त्यास प्रत्युत्तर देत आहेत. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

Advertisement

चव्हाण यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे, की ‘तौक्ते चक्रीवादळामुळे देशातील पाच राज्ये प्रभावित झाली आहेत. मात्र, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त गुजरातचा दौरा केला आणि या राज्यास आर्थिक मदतीची घोषणा केली. हा भेदभाव कशासाठी ? बाकी राज्यातील पिडीत जनते प्रति आपली काही जबाबदारी नाही का ?’ अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे.

Advertisement

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी अन्य नुकसानग्रस्त राज्यांचा दौरा केला नसला तरी नुकसानग्रस्त सर्व राज्यांना मदत दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या राज्यांना मदत मिळणार आहेच, या मुद्द्यावर जाणीवपूर्वक राजकारण केले जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतरही हा वाद मिटलेला नाही. केंद्र सरकारने देशभरात तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या भागात मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply