Take a fresh look at your lifestyle.

मराठा आरक्षण मोर्चाबद्दल खासदार संभाजीराजे यांनी मांडली ‘ती’ महत्वाची भूमिका..!

नाशिक : सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात खदखद आहे. अशावेळी आता पुन्हा एकदा आरक्षणासाठी मोठे मोर्चे काढण्याचा मुद्दा मांडला जात आहे. आर-पारच्या लढाईची भाषा करणारे कार्यकर्तेही यासाठी तयारीत आहेत. मात्र, एकूण आरोग्याचा प्रश्न मोठा असून अशावेळी मोर्चा न काढण्याची अनेकांची भूमिका आहे. त्याचाच पुनरुच्चार खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिक येथे केला आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे की, अारक्षणाबाबत मराठा समाजामध्ये संभ्रम अाहे. पुढील काही दिवसांतच भूमिका जाहीर करणार अाहे. माझी भूमिका ही समाजाचीच असेल. अनेक राजकीय पक्ष त्यांच्या परीने भूमिका जाहीर करत आहेत. असे असले तरी ताे त्यांचा प्रश्न अाहे. केंद्राने राज्याचे अधिकार काढून घेतले का? अॅटर्नी जनरल यांनी काय मत मांडले? याबाबत प्रश्न आणि संभ्रम आहे. या सर्वांविषयी मी बाेलणार अाहे. आरक्षण मिळवण्यासाठी ज्या समाजाच्या भावना अाहेत, त्याच माझ्याही आहेत. यासाठी मी कटिबद्ध आहे.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले की, काेराेना महामारी थांबवणे सध्या गरजेचे अाहे. अापण जर जगलाे तर अारक्षणासाठी लढा देऊ शकताे. ही वेळ माेर्चा काढण्याची नाही. यातून सामान्य माणसाला त्रास हाेईल. मराठा अारक्षणाबाबत माझी पहिल्यापासूनच संयमाची भूमिका अाहे. समाजातील अनेक घटकांशी, अनेक विद्वानांशी, वकिलांशी चर्चा करणार अाहे. माझी भूमिका म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांची भूमिका असणार अाहे.

Advertisement

संपादन : संतोष वाघ

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply