Take a fresh look at your lifestyle.

बँकांकडून मिळेना सर्वसामान्यांना आधार; अखेर RBI लाही द्यावी लागली अशी तंबी

मुंबई : देशात करोनाचे संकट वाढत असून या संकटाच्या काळात सर्वसामान्यांना आधार देण्यासाठी राज्यांना अनेक निर्णय घेतले आहेत. आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. या काळात आरबीआयने सुद्धा काही महत्वाचे निर्णय घेतले होते. या निर्णयांची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची वेळ आता आहे. त्यामुळे आरबीआयने देशातील सरकारी बँकांना तंबी देत बँकेने केलेल्या घोषणांची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत.

Advertisement

मुळातच सरकारी कार्यालय म्हटले की तेथे कामकाज वेळेत होत नाही, अशा तक्रारी असतातच. या तक्रारीत तथ्यही आहे. आताच्या ऑनलाइनच्या जमान्यातही सरकारी कामकाजा अपेक्षित वेळेत होत नाही. सरकारी बँकांचीही परिस्थिती यापेक्षा वेगळी नाही. त्यामुळेच कामकाज वेळेबाबत नेहमीच तक्रारी केल्या जातात. आता तर देशात करोना विषाणूचे अभूतपूर्व संकट उभे राहिले आहे. या संकटाने नागरिक पुरते हैराण झाले आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडल्या आहेत. उद्योग व्यवसाय उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेस जबरदस्त फटका बसला आहे. या भीषण संकटाच्या काळात वेळेवर मदत मिळणेही तितकेच आवश्यक आहे.

Advertisement

आरबीआयने मागील महिन्यात काही महत्वाचे निर्णय घेतले होते, काही घोषणाही केल्या होत्या. आरोग्य क्षेत्राशी निगडीत कंपन्यांना ५० हजार कोटी रुपये किफायतशीर कर्ज सुविधा, सूक्ष्म, लघु व मध्यम स्वरुपाच्या उद्योगांना कर्ज उपलब्ध करुन देणे, कर्जाचे पुनर्गठण करणे तसेच केवायसी पद्धतीस तर्कसंगत करणे या निर्णयांचा समावेश होता. या निर्णयांची अंमलबजावणी बँकांनी तत्काळ सुरू करावी, असे आदेश आरबीआयचे गव्हर्नर डॉ. शक्तिकांत दास यांनी सरकारी बँकांच्या एमडी आणि सीईओ यांना दिले.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply