Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ देशाची रोजगार आणि अर्थव्यवस्थास्थिती आहे सर्वात बेस्ट; पहा भारताचा कितवा आहे यादीत नंबर

मुंबई : संकटे कधी एकटी येत नाहीत.. असे आपल्याकडे नेहमीच म्हटले जाते. त्याचाच प्रत्यय देशातील जनता घेत आहे. करोनाचे महाभयानक संकट तर आहेच. त्याच सोबत चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, काळी बुरशीचा घातक आजार, कोलमडून पडलेली आरोग्य व्यवस्था अशा एक ना अनेक संकटांचा सामना देश आज करत आहे.

Advertisement

करोनाच्या संकटकाळात देशात आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यावर विदेशातूनही टीका होत आहे. देशाला अडचणीत आणणारे काही अहवालही याआधी प्रसिद्ध झाले आहेत. आताही अहवाल येतच आहेत. असाच एक अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अहवालात असे म्हटले आहे, की भारत देश राहण्यासाठी आणि कामकाज करण्यासाठी योग्य नाही. करोना महामारीच्या काळात भारताबाबत विदेशी नागरिकांचे मत आता बदलले आहे. याचा परिणाम असा झाला आहे की, आता राहण्यासाठी आणि कामकाज करण्याच्या दृष्टीने पात्र असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा नंबर खाली आला आहे. परदेशी नागरिकांच्या प्राधान्यावर आधारीत सूचकांक ‘एक्सपैक्ट इनसाइडर २०२१’ मध्ये भारतास योग्य सन्मान मिळालेला नाही. जर्मनीची नामांकीत संस्था ‘इंटरनेशन्स’ दरवर्षी यादी जाहीर करत असते.

Advertisement

ही यादी जाहीर करताना आधी सर्वे करण्यात आला होता. या सर्वेत ५९ देशांतील १२ हजार ४२० अशा नागरिकांचा समावेश करण्यात आला होती की जे त्या देशांचे मूळ निवासी नव्हते. या लोकांना संबंधित देशांतील रोजगार, आर्थिक खर्च, आरोग्य सुविधा यांबाबत विविध प्रश्न विचारण्यात आले. यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे देशांची रँकिंग निश्चित करण्यात आली. या यादीत भारतास ५१ वा क्रमांक देण्यात आला. या सर्वेनुसार भारतात राहणारे परदेशी नागरिक तसेच याआधी देशात राहिलेले परदेशी नागरिकांनी सांगितले की देशात वायू प्रदूषणाची समस्या आहे. पाणी आणि स्वच्छतेसारख्या मुलभूत यंत्रणांची अवस्था खराब आहे. यामुळेच भारतात राहणे कठीण आहे. यामध्येही आनंदाची गोष्ट म्हणजे जवळपास ८२ टक्के नागरिकांनी सांगितले की भारताची आर्थिक स्थिती चांगली आहे.

Advertisement

या यादीत तैवानला पहिला क्रमांक देण्यात आला आहे. तैवानमध्ये रोजगार आणि अर्थव्यवस्था अतिशय मजबूत असल्याचे मत लोकांनी मांडले. यानंतर मेक्सिकोस दुसरा तर कोस्टारिका देशास तिसरा क्रमांक देण्यात आला. तर जगातील सर्वात बलाढ्य देश असणाऱ्या अमेरिकेस या यादीत ३४ वा क्रमांक मिळाला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply