Take a fresh look at your lifestyle.

तौक्ते चक्रीवादळाचा दिल्लीमध्ये झालाय ‘हा’ परिणाम; ७० वर्षांनी घडले असे काही..

दिल्ली : तौक्ते चक्रीवादळाचा परिणाम आता उत्तर भारतातल्या अनेक राज्यात जाणवत आहे. राजधानी दिल्लीत तर बुधवारपासून पावसास सुरुवात झाली आहे. या काळात तापमानात मोठ्या प्रमाणात घट नोंदवण्यात आली. विशेष म्हणजे, दिल्लीत ७० वर्षांनंतर प्रथमच सर्वात कमी म्हणजेच २३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद घेण्यात आली. दिल्लीत सध्या पाऊस सुरू असून पुढील २४ तासातही पाऊस असाच सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisement

तौक्ते चक्रीवादळाने महाराष्ट्र, गोवा व गुजरात या राज्यात मोठे नुकसान केले. त्यानंतर हे वादळ उत्तर भारताच्या दिशेने पुढे निघाले. या वादळाचा परिणाम म्हणून उत्तर भारतातील अनेक राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने आधीच दिला होता. त्यानुसार येथे अनेक ठिकाणी पाऊस होत आहे.

Advertisement

राजधानी दिल्लीत तर सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे येथील हवामानात बदल झाला आहे. तापमान इतके घटले आहे, की या घटलेल्या तापमानाने एक रेकॉर्डच केले आहे. वास्तविक पाहता, येथे इतके तापमान कधीच नसते. मात्र, ७० वर्षात प्रथमच कमी तापमान नोंदवले गेले आहे. सन १९५१ च्या आधी कमी तापमानाचे रेकॉर्ड तुटले होते. त्यानंतर १९८२ मध्ये सर्वाधिक कमी म्हणजे २४.८ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले होते, असे हवामान विभागाचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव यांना सांगितले.

Advertisement

दरम्यान, या नैसर्गिक संकटानंतर पुन्हा एकदा असेच संकट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. तौक्ते वादळानंतर आता यास चक्रीवादळ येणार आहे. या वादळाचा फटका ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांना बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. देशात सध्या करोनाचे संकट मोठे आहे. देश अजूनही या संकटातून बाहेर पडलेला नाही. उलट देशात करोना विषाणू वाढतच चालला आहे. या संकटातच आता नैसर्गिक संकटेही येऊ लागली आहेत. त्यामुळे देशास एकाच वेळी अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply