Take a fresh look at your lifestyle.

तब्बल ‘इतक्या’ टक्के नागरिकांनी दिलीय करोना प्रोटोकॉलला तिलांजली; पहा काय म्हटलेय आरोग्य विभागाने

दिल्ली : देशात करोनाचे संक्रमण वाढत असून काही राज्यात करोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत. अशा काळात या विषाणूपासून बचाव करण्यासाठी मास्क वापरणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, जवळपास पन्नास टक्के लोक अजूनही मास्क वापरत नसल्याची धक्कादायक माहिती खुद्द आरोग्य विभागानेच दिली आहे.

Advertisement

देशात करोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. नागरिकांनी सुद्धा करोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. नागरिक या नियमांचे पालन तर करत आहेत. मात्र, काही लोकांना अजूनही या आजाराचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही.

Advertisement

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले, की एका अभ्यासात असे दिसून आले आहे की जवळपास पन्नास टक्के लोक अजूनही मास्क वापरत नाहीत. तसेच ६४ टक्के लोक असे आहेत की जे फक्त तोंड झाकून घेतात, नाक नाही. ही पद्धत अर्थातच चुकीची आहे. यामुळे करोना विषाणूचे संक्रमण वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य पद्धतीने मास्क वापरावा, या पद्धती काय आहेत, याची माहिती सरकार वारंवार देत आहे.

Advertisement

देशातील करोना स्थितीबाबत माहिती देताना आरोग्य विभागाचे सचिव अग्रवाल म्हणाले, की देशात करोनाच्या एकूण सक्रीय प्रकरणांपैकी ६९ प्रकरणे फक्त आठ राज्यात आहेत. २१ राज्य आहेत जेथे करोना संक्रमित रुग्णांच्या तुलनेत करोनातून दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. करोना संक्रमणात मागील दोन आठवड्यांपासून घट होत आहे. देशातील सात राज्यात करोना संक्रमण दर २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर २२ राज्यात करोना संक्रमण दर १५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Advertisement

करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. या प्रयत्नांमुळे दुसऱ्या लाटेचा जोर काहीसा कमी झाला आहे. रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मात्र, अजूनही धोका टळलेला नाही. रुग्णांची संख्या कमी होत असली तरी अजूनही एका दिवसात दोन लाखांपेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत.

Advertisement

v  कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

v  | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply