Take a fresh look at your lifestyle.

जमिनी बळकावण्यासाठी चीनने केलाय ‘तोही’ उद्योग; पहा नेमके काय होणार परिणाम

दिल्ली : चीनच्या कुरापतींनी जगातील अनेक देश हैराण झाले आहेत. कोणत्या तरी मार्गाने त्रास देण्याचे उद्योग चीन कायमच करत आला आहे. जगातील गरीब देशांना कर्जाच्या जाळ्यात ओढण्याचे काम तर चीन करत आहेच. आता शेजारील देशांच्या जमिनी बळकावण्याचे उद्योगही या देशाने सुरू केले आहेत. चीनच्या या कुरापतींचा फटका पुन्हा एकदा नेपाळला बसला आहे.

Advertisement

नेपाळ हा तसा लहानच देश आहे. काही दिवसांपासून भारत आणि नेपाळमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. याचा फायदा घेत चीनने नेपाळ बरोबर मित्रत्व वाढवले आहे. मात्र, याचाही फटका आता नेपाळला बसत आहे. चीनने नेपाळच्या जमिनीवर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न चालवल्याचे समोर आले आहे. चीनने सीमावर्ती दौलखा जिल्ह्यात काही पिलर गायब केल्याची माहिती आहे. नेपाळच्या गृह मंत्रालयाने या घटनेची तक्रार विदेश मंत्रालयाकडे केली आहे.

Advertisement

चीनने याआधी हुमलामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा उद्योग केला होता. नेपाळच्या या जिल्ह्यात तर चीनने काही इमारतींचे बांधकाम केले होते. यानंतर नेपाळमध्ये चीन विरोधात नागरिकांनी प्रद्रर्शने केली होती. मात्र, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. यानंतर आता पुन्हा एकदा चीनने असाच प्रयत्न केला आहे. त्यामुळे नेपाळला धोका निर्माण झाला आहे. नेपाळच्या पंतप्रधानपदी पुन्हा के. पी. शर्मा ओली यांची निवड करण्यात आली आहे. ओली यांचा चीनकडेच जास्त झुकाव आहे. त्यामुळे या मुद्द्यावर नेपाळ काही कार्यवाही करेल, याबाबत शंका उपस्थित होत आहे.

Advertisement

चीनने मात्र या परिस्थितीचा फायदा घेतला आहे. शेजारील देश सध्या करोनाच्या संकटात अडकले आहेत. त्यांना संकटात मदत करण्याऐवजी अशा पद्धतीने खोडसाळपणा करत त्रास देण्याचे काम चीन करत आहे. भारतासही असाच त्रास देण्याचे काम चीन अजूनही करत आहे. आता याचा फटका नेपाळलाही बसत आहे. चीन आणि नेपाळच्या हद्दी निश्चित केल्या आहेत. १९६०-६१ मध्येच याबाबत निर्णय घेण्यात आला होता. यानंतरही यामध्ये वेळोवेळी बदल झाले. काही पिलर्स हटवण्यात आले. याचाच फायदा आता चीन घेत असून नेपाळची जमीन बळकावण्याच्या प्रयत्नात असल्याचे समजते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply