Take a fresh look at your lifestyle.

ओबीसीमध्ये ‘त्या’ पद्धतीने द्यावे मराठा आरक्षण; पहा नेमकी काय मागणी आहे ठोक मोर्चाची

सोलापूर : मराठा आरक्षणाचा तिढा सुटण्याची कोणतेही चिन्हे नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या विरोधात निर्णय दिल्याने या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात खदखद आहे. अशावेळी नेमका कोणता तोडगा काढून हा प्रश्न निकाली काढावा याचेच कोडे माराष्ट्र सरकारसमोर आहे. त्यावर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने शिवार बैठक घेऊन चर्चा करण्यात आली.

Advertisement

बुधवारी करमाळा तालुक्यातील बिटरगाव येथे ही बैठक झाली. मराठा ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे, सुनील नागणे, किरणराज घाडगे, धनाजी साखळकर, संदीप मुटकुळे, स्वागत कदम, संतोष कवडे, रामभाऊ गायकवाड, आनंद मोरे, योगेश पवार, सोमनाथ राऊत, आशू ढवळे, धनंजय मोरे, बापू चौधरी, नीलेश गंतोडे, ॲड. सागर आटकळे, तात्या जगताप, सुमित शिंदे, आकाश पवार, आनंद मोरे, धनंजय घोरपडे आदि यावेळी उपस्थित होते.

Advertisement

डोंगरे यांनी याबाबत म्हटले आहे की, मराठा समाज तीव्रपणे आंदोलनास सज्ज होत आहे. समाजामध्ये असंतोष निर्माण होऊन कोणत्याही प्रकारचे घाईघाईने काहीही चुकीचे प्रकार होऊ नये म्हणूनच ओबीसी आरक्षण हीच आमची रास्त मागणी आहे. प्रसंगी यासाठी रस्त्यावर उतरून मराठा समाज एकाच दिशेने जाऊन तीव्र आंदोलन करेल.

Advertisement

दरम्यान, संभाजी ब्रिगेड माळशिरस तालुका अध्यक्ष हनुमंतराव सांळुखे पाटील, तालुका उपाध्यक्ष सचिन पराडे- पाटील, महाळूंगट अध्यक्ष रविराज पराडे-पाटील, अमित साळुंखे पाटील मांडवे यांनी मागणी केली आहे की, मराठा समाजाचा सरसकट ओबीसीमध्ये समावेश करून आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला न्याय द्यावा. असे निवेदन त्यांनी दिले आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply