Take a fresh look at your lifestyle.

उजनीच्या पाण्यावरून राष्ट्रवादी-भाजप आमनेसामने; पहा नेमके काय म्हटलेय आंदोलकांनी

सोलापूर : उजनी धारणातील ५ टीएमसी पाणी सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला उचलण्याचा निर्णय जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रद्द केल्यामुळे सोलापूरमधील अनेकांनी याचे स्वागत केले आहे. मात्र, तरीही यावरून या जिल्ह्यातील भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना लक्ष्य केले आहे. परिणामी हा वाद आता राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असाच पेटला आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा आदेश रद्द करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय दिल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी म्हटले आहे.

Advertisement

उजनीचे पाणी पळवणारे खरे सूत्रधार अजित पवार असून, ते शब्द फिरवण्यात पटाईत अाहेत, अशी टीका भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केली आहे. त्यामुळे जोपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी होऊन शासन निर्णय होत नाही. जलसंपदा विभागाचा आदेश होत नाही. तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे स्वत: उजनी धरणातून पाणी नेण्यासंदर्भातील निर्णय रद्द झाल्याचे जाहीर करीत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. २१ मे रोजी नामदेव पायरीजवळचे आंदोलन होणार असल्याची माहिती आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली आहे.

Advertisement

उजनी पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने बुधवारी नामदेव पायरीजवळ विठ्ठलाला अभिषेक करण्यात आला. राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला चांगली बुद्धी देऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय थांबवण्याचे साकडे त्यांनी घातले. तसेच आदेश रद्द करण्यात आल्याचा जलसंपदा मंत्र्यांनी मंगळवारी घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ जल्लोष झाला. हा विजय शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय अाहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा आदेश रद्द करेपर्यंत या पुढेही आंदोलन सुरूच राहणार आहे, असे माऊली हळणवर यांनी या वेळी सांगितले.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply