Take a fresh look at your lifestyle.

इस्राईल-पॅलेस्टाईनच्या संघर्षात येऊ शकते ‘अशी’ही बातमी; पहा काय सुरू आहे चर्चा

दिल्ली : इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील  हमास संघटना यांच्यात सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष थांबवण्यासाठी दोन्ही देशांवर जागतिक दबाव आहे. त्यामुळे या दोन्ही गटामधील भांडण लवकरच संपेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. हमास नेत्यांनी असे सांगितले आहे की, येत्या 24 तासांत युद्धबंदीची घोषणा होऊ शकते.

Advertisement

2014 नंतर झालेल्या सर्वात भयंकर संघर्षात गाझा पट्टीमध्ये किमान 227 आणि इस्त्राईलमध्ये 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हमासने इस्त्राईलवर सुमारे 4 हजार रॉकेटचा मारा केला असून इस्त्रायली सैन्याने शेकडो हवाई आणि भूमी हल्लेही केले आहेत. हमास नेत्यांनी अमेरिकन टीव्ही चॅनेल सीएनएनला सांगितले की, येत्या 24 तासांत इस्राईल आणि हमास यांच्यात युद्धबंदी जाहीर केली जाऊ शकते. मात्र, अद्याप इस्त्राईलकडून याबाबत कोणतीही भूमिका मांडण्यात आलेली नाही. हमासचे राजकीय ब्युरो नेते मुस अबू मरजोक म्हणाले की, दोन दिवसांत युद्धबंदी जाहीर होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.

Advertisement

दरम्यान, अमेरिकेने बुधवारी युध्दविराम होण्याच्या संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावाला विरोध केला आहे. इस्राईल आणि पॅलेस्टाईनमधील हिंसाचार रोखण्यासाठी आणलेला प्रस्ताव अमेरिकेने 4 वेळा संयुक्त राष्ट्रांसमोर रोखला आहे. यानंतर फ्रान्सने हा प्रस्ताव तयार केला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात 11 दिवस चाललेल्या भांडणाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी विनंती करूनही इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी बुधवारी गाझा पट्टीवर सैन्य कारवाई सुरू ठेवण्याचे सांगून टाकले आहे. नेतान्याहू यांच्या या आडमुठ्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रयत्नांना खीळ बसली आहे.

Advertisement

इस्रायलने बुधवारीही गाझावर हवाई हल्ले सुरू ठेवले. तर पॅलेस्टाईन गटानेही प्रत्युत्तर म्हणून दिवसभर इस्रायलवर रॉकेटहल्ला केला. दरम्यान, लेबेनॉनमधून उत्तर इस्त्राईलमध्येही रॉकेट टाकण्यात आले आहेत. नेतान्याहू म्हणाले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या सहकार्याचे कौतुक आहे. पण इस्रायलच्या लोकांना शांतता व सुरक्षा परत मिळवून देण्यासाठी देशातील ही मोहीम सुरू ठेवली जाणार आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply