Take a fresh look at your lifestyle.

अमेरिकेच्या ‘त्या’ कृतीने चीनचा झालाय तिळपापड; पहा काय झालाय नेमका विषय

दिल्ली : चीन आणि अमेरिकेत काही दिवसांपासून तणाव निर्माण झाला आहे. व्यापाराच्या मुद्द्यावर तर दोन्ही देशात सातत्याने वाद होत आहेत. चीनच्या वाढत्या दादागिरीला आळा घालण्यासाठी अमेरिकेसह अन्य काही देश प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच चीनसाठी वादग्रस्त ठरणाऱ्या मुद्द्यांत दखल देत आहेत. अमेरिका यात आघाडीवर आहे. आताही अमेरिकेने असेच काही केले आहे. त्यामुळे चीन चांगलाच संतापला असून अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत.

Advertisement

चीन सुरुवातीपासूनच तैवानवर आपला दावा करत आहे. मात्र, तैवानने हे मान्य केलेले नाही. तैवान आजही स्वतःला एक स्वतंत्र देश समजतो. त्यामुळे चीन आणि तैवानमध्येही कायमच तणाव आहे. या परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे. चीनच्या विरोधात तैवानला मदत करण्याचे काम अमेरिका करत आहे. आताही अमेरिकेच्या नौदलाचे मोठे जहाज तैवानच्या खाडीत पाठवण्यात आले आहे. यास चीनने मात्र तीव्र आक्षेप घेतला आहे. चीनने यास अमेरिकेची दादागिरी म्हटले आहे.

Advertisement

दक्षिण चीन समुद्रालगत तैवानच्या खाडीचा ११० मैलांचा विस्तार आंतरराष्ट्रीय प्रदेश समजला जातो. मात्र, चीन यावर दावा करत आहे. अमेरिकेस मात्र हे मान्य नाही. त्यामुळेच अमेरिका येथे चीनला वारंवार आव्हान देत आहे. आताही या प्रदेशात अमेरिकी नौदलाने आणखी एक युद्धनौका पाठवली आहे. त्यामुळे चीन चांगलाच संतापला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply