Take a fresh look at your lifestyle.

अखेर सरकारला आलीच शेतकरी प्रश्नावर जाग; पहा कसे मिळणार खतावर अनुदान

मुंबई : शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रासायनिक खताच्या दरवाढीमुळे देशभरात विरोधक आणि शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या होत्या. महाराष्ट्र सरकारनेही याबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे अखेर वाढता दबाव आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची उशिरा का होईना जाणीव झाल्यावर केंद्र सरकारने रासायनिक खतावर अनुदान वाढ केली आहे.

Advertisement

Chandrakant Patil on Twitter: “शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय DAP खतावर सबसिडी १४०% वाढविण्यात आली. DAP च्या प्रति पोत्यावर आता रु.५००च्या एवजी १२०० रु सबसिडी मिळणार. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय किंमतीत वाढ झाल्यानंतरही शेतकऱ्यांना DAPचे एक पोते रु.२४०० च्या एवजी १२०० रुपयांनाच मिळणार. https://t.co/kyf4gYa2vr” / Twitter

Advertisement

याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी खतांच्या दरांवरून उच्चस्तरीय बैठक घेऊन डीएपी खतावरील अनुदान ५०० रुपये प्रतिबॅगने वाढवून १,२०० रुपये करण्याचा निर्णय झाला. मात्र, सर्वच प्रकारच्या खताच्या किमतीत वाढ झालेली आहे. अशावेळी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार आणखी कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. मात्र, त्याचवेळी सत्ताधारी भाजपने याचे श्रेय घेताना दणक्यात प्रचारास सुरुवात केली आहे.

Advertisement

डीएपी हे खत १,२०० रुपयांच्या जुन्याच दराने विकले जाणार आहे. सध्या त्याची किंमत २,४०० रुपये प्रतिबॅग आहे. फॉस्फोरिक अॅसिड, अमोनिया आदींच्या अांतरराष्ट्रीय किमती ६०% ते ७०% पर्यंत वाढल्याने डीएपी खतही महागले आहेत. केंद्र सरकार दरवर्षी रासायनिक खतांच्या अनुदानावर सुमारे ८० हजार कोटी रुपये खर्च करते. डीएपीत अनुदान वाढीसोबतच खरीपात सरकार १४,७७५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च करणार असल्याचा आकडाही फिरवण्यास भाजपने सुरुवात केली आहे.

Advertisement

संपादन : महादेव गवळी

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply