Take a fresh look at your lifestyle.

कोरोनाच्या भीतीने रॉकेल पिला, अघोरी उपाय जीवाशी आला.. पहा नेमकं काय झालं..?

नवी दिल्ली : कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झालं. आजारापेक्षा लोकांच्या मनात या आजाराबाबत भीतीच जास्त आहे. त्यामुळे अनेक जण या आजाराने मानसिकरीत्या खचले आहेत. अनेकांनी कोरोनाचा अक्षरशः धसका घेतला आहे. त्यामुळे कोरोना झाल्याच्या भीतीतून अनेक जण नको ते उपचार करीत आहेत. मात्र, त्यातून आजार बरा होण्याऐवजी दुसरेच प्रकार घडत आहेत. त्यातून लोकांच्या मनात कोरोनाची भीती किती बसली आहे, हेच स्पष्ट होते. असाच एक अघोरी उपाय भोपाळमधील तरुणाच्या जीवावर बेतला..

Advertisement

तर त्याच झालं असं, की कोरोनाची लागण झाल्याच्या भीतीतून भोपाळमधील एक तरुण थेट रॉकेल (Kerosene) प्यायला. मात्र, प्रमाणापेक्षा अधिक रॉकेल प्यायल्यानं संबंधित युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. महेंद्र (वय 30) असं या युवकाचं नाव आहे. भोपाळमध्ये तो टेलरचं काम करीत होता.

Advertisement

काही दिवसांपासून महेंद्र तापानं फणफणला होता. त्यातून आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची शंका त्याला आली. कोरोनामधून बरं होण्यासाठी एका मित्रानं त्याला रॉकेल पिण्याचा सल्ला दिला. मित्राच्या सल्ल्यानुसार, त्याने मोठया प्रमाणात रॉकेलचे सेवन केलं. मात्र, त्यामुळे त्याची प्रकृती अधिकच बिकट झाली.

Advertisement

कुटुंबीयांनी तातडीने महेंद्रला रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. महेंद्रला मागील 6 दिवसांपासून ताप येत होता. औषधोपचारानंतरही त्याच्या प्रकृतीत काहीच फरक पडत नव्हता. त्यामुळे कोरोनाची लागण तर झाली नाही ना, असा संशय त्याला आला. एका मित्राच्या सल्ल्यानं तो रॉकेल प्यायला.

Advertisement

घरातील लोकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केलं. परंतु, तिथे बेड उपलब्ध नसल्यानं, त्याला प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर खासगी रुग्णालयात त्याला हलविले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Advertisement

कोरोना टेस्ट निगेटिव्ह

Advertisement

पोलिसांच्या माहितीनुसार, रुग्णालय प्रशासनानं महेंद्रच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना चाचणी केली असता, महेंद्रची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली. मात्र, कोरोनाच्या भीतीनं भलताचं उपचार केल्यानं महेंद्रला आपला जीव गमवावा लागला.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply