Take a fresh look at your lifestyle.

वाढली की चीनची डोकेदुखी; पहा कोणत्या नव्या शस्त्राने त्यांना फुटणार घाम..!

दिल्ली : भारताचा मुजोर शेजारी असलेल्या चीनमुळे अवघ्या जगाला डोकेदुखी वाढलेली आहे. मात्र, आता त्याच चीनला घाम फोडणारी बातमी आलेली आहे. कारण, रशिया आणि चीनवर वचक ठेवायला आता अमेरिकन सरकारही सरसावले आहे.

Advertisement

होय, रशिया, चीननंतर आता अमेरिकेलाही हायपरसॉनिक क्षेपणास्त्र बनविण्यात यश आले आहे. ही अमेरिकन क्षेपणास्त्रे 17 पट जास्त वेगाने शत्रूच्या देशाचा नाश करण्यास सक्षम आहेत. रडारच्या तावडीत सापडत नसलेल्या यूएस डिफेन्सच्या या नवीन क्षेपणास्त्राची स्ट्राइक रेंज तब्बल 2700 किमी आहे. या क्षेपणास्त्रामुळे अमेरिका आता दूरवरुन रशिया आणि चीनवर भीषण हल्ला चढवू शकला आहे. अमेरिकेच्या लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले की, हे क्षेपणास्त्र आता हायपरसॉनिक वेगाने लांब पल्ल्यांचे लक्ष्य ठेवण्यास सक्षम आहे. आता 2023 मध्ये अमेरिका या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याच्या विचारात आहे.

Advertisement

हे एका ट्रकवर लोड करून लॉन्च केले जाऊ शकते. ट्रकवर दोन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र तैनात करता येतात. अमेरिकन सैन्याचे हे क्षेपणास्त्र नौदलाच्या एका शस्त्रावर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. यूएस नेव्ही आपली ही हायपरसॉनिक क्षेपणास्त्र सर्व 69 ड्रिस्‍ट्रायरवर तैनात करणार आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे क्षेपणास्त्र शत्रूंसाठी टाईम वॉर म्हणून काम करेल. अशा श्रेणीमुळे हे क्षेपणास्त्र आता प्रशांत महासागरात कोठेही दक्षिण कोरिया, तैवान, जपान किंवा फिलिपिन्समध्ये तैनात केले जाऊ शकते. याद्वारे दक्षिण चीनी समुद्र आणि चीनच्या हेनान बेटांवर किंवा चीनच्या मुख्य भूभागांवर स्थित लष्करी तळावर जोरदार हल्ला होऊ शकतो.

Advertisement

अमेरिका आपली ही क्षेपणास्त्र 3 लाख चौरस मैलांच्या क्षेत्रात कुठेही लपवू शकेल. जर हे क्षेपणास्त्र लंडन शहरात तैनात केले गेले तर ते रशियाच्या पूर्वेकडील प्रदेशाला सहज लक्ष्य करू शकते. रशिया आणि चीनने पहिले हायपरसॉनिक क्षेपणास्त्र बनवले. मात्र, त्यांनाच आता एक मोठे संकट निर्माण झाले आहे. आता अमेरिका लवकरच आपल्या नवीन क्षेपणास्त्रांसह चीन आणि रशियाला मागे टाकेल.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply