Take a fresh look at your lifestyle.

WHO ने आठवण करून दिली कोवैक्स अभियानाची; पहा काय परिणाम होणार भारतीय लसीकरण अभियानावर

दिल्ली : जगभरातील अनेक देश करोना विषाणूच्या विळख्यात सापडले आहेत. या देशांना करोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी करोना प्रतिबंधक लस मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, जगातील अनेक देश गरीब आहेत, त्यामुळे या देशांना लस कशा उपलब्ध होणार हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने भारतास महत्वाचे आवाहन केले आहे. संघटनेने भारतास कोवैक्स अभियानाची आठवण करुन दिली आहे.

Advertisement

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुक टेड्रोस घेब्रेयसस यांनी एका संमेलनात सांगितले, की भारतात करोना महामारीचा प्रकोप थांबल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटने कोवैक्स अभियानांतर्गत जगातील अन्य देशांना करोना प्रतिबंधक लस दिल्या पाहिजेत. घेब्रेयसस पुढे म्हणाले, की जगात करोना रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढल्याने लसींची कमतरता जाणवत आहे. कोवैक्स अभियानांतर्गत आतापर्यंत १२४ देशांना जवळपास साडे सहा कोटी लस देण्यात आल्या आहेत. युनिसेफनेही याबाबत मत मांडले आहे. युनिसेफच्या मते भारतात करोना व्हायरसने विक्राळ रुप धारण केल्याने लसींचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

Advertisement

भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दररोज लाखोंच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांनाच लस मिळण्यात अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी लसींअभावी लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याआधी मात्र भारताने अनेक देशांना करोना प्रतिबंधक लसी दिल्या होत्या. आता मात्र भारतातील करोनाची परिस्थिती पाहता हे शक्य होणार नाही. त्यामुळे जगातील अन्य देशांना लसी मिळत नाहीत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी जगातील श्रीमंत देशांनी गरीब देशांना लसी द्याव्यात, असे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी केले होते.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply