Take a fresh look at your lifestyle.

‘त्यांनी’ केलाय जगभरात कचरा; पहा कोण जबाबदार आहे या प्लास्टिक संकटाला

मुंबई : पर्यावरणाचे रक्षण करायचे म्हटले की यासाठी आधी समस्या शोधून त्यावर उपाय करणे आवश्यक आहे. जगाला या समस्या माहित नाही असेही नाही. समस्या माहित आहेत. मात्र, यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले तर कोट्यावधींचे नुकसान होईल ना.. मग कशाला त्या भानगडीत पडायचे असे म्हणून फक्त समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे म्हणून वेळ मारुन नेण्याचे काम जगातील अनेक देश करत आहेत. विकसित देश यामध्ये आघाडीवर आहेत. मात्र, विकसित देशांच्या या स्वार्थीपणाचा पर्यावरणावर जो व्हायचा तो परिणाम झाला आहेच, हे अगदी स्पष्टच आहे.

Advertisement

अतिप्रमाणात कार्बन डायऑक्साइड व अन्य घातक वायूंच्या उत्सर्जनामुळे प्रदूषण कमालीचे वाढले आहे. त्यामुळे मानवांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. वृक्षांची बेसुमार तोड केल्याने जंगले नष्ट झाली आहेत. त्यामुळे आज जग ग्लोबल वॉर्मिंगसारख्या संकटाचा सामना करावा लागत आहे. प्लास्टिकचा वापर वाढला आहे. प्लास्टिकच्या कचऱ्याने पर्यावरणाच्या अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. आता या प्लास्टिकबाबत धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Advertisement

सिंगल यूज प्लास्टिकने पर्यावरणाचे मोठे नुकसान केले आहे. सिंगल यूज प्लास्टिकमुळे मोठ्या शहरात जलभरावाची समस्या कायम उद्भवत आहे. तसेच हे प्लास्टिक मानवी आरोग्यस घातक सिद्ध होत आहे. कितीतरी प्रयत्न केले मात्र अजूनही या प्लास्टिकला हद्दपार करता आलेले नाही. आता तर याचा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यामुळे समस्या मिटणार तरी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement

जगातील मोठ्या देशांकडून प्लास्टिक तयार करणाऱ्या कंपन्यांना भरघोस आर्थिक मदत दिली जाते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जगभरात तयार होणाऱ्या या सिंगल यूज प्लास्टिकचा ९० टक्के कचरा फक्त १०० कंपन्यांद्वारे केला जात आहे. तर दुसरीकडे जगातील निम्म्यापेक्षा जास्त कचरा फक्त २० कंपन्यांद्वारे तयार होत असल्याचे समोर आले आहे. या कंपन्या पेट्रो केमिकलशी संबंधित आहेत. यामध्ये अमेरिका आणि चीनच्या कंपन्यांचा समावेश आहे. स्टॉकहोम एनवायर्नमेंट इंन्स्टिट्यूट आणि मिंडेरू फाऊंडेशनने याबाबत अभ्यास करत यातील कार्पोरेट नेटवर्कचीही चौकशी केली.

Advertisement

यासाठी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या कंपन्यांना कच्चा माल पुरवठा करणाऱ्या एक हजारपेक्षा जास्त कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला. या प्लास्टिकचा वापर शक्यतो पॅकेजिंग करण्यासाठी केला जातो. नंतर या प्लास्टिकला फेकून दिले जाते, आणि हेच प्लास्टिक पुढे समुद्रापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचते.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply