Take a fresh look at your lifestyle.

तोक्ते चक्रीवादळ परिणाम : पहा कोणत्या राज्यात आणि भागात आहे मुसळधारची शक्यता

दिल्ली : तोक्ते चक्रीवादळाचा परिणाम आता उत्तर भारतात दिसून येत आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या वादळाचा जोर आता कमी पडला असला तरी अजूनही दक्षिण राजस्थान आणि गुजरातमध्ये धोका टळलेला नाही. बुधवारी राजस्थानच्या काही भागात मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

उत्तर भारतातील उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली सह अनेक राज्यात पाऊस होण्याचा अंदाज आहे. राजस्थानातील उदयपूरपासून ६० किलोमीटर पश्चिम-दक्षिण पश्चिम भागात आणि गुजरात राज्यातील डीसा पासून ११० किलोमीटर अंतरावर या चक्रीवादळाच्या दबावाचे क्षेत्र आहे. पुढील दोन दिवसात पश्चिमी उत्तर प्रदेशकडे चक्रीवादळ जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे. उत्तराखंड राज्यात पावसा बरोबरच जमीन खचण्याचाही इशारा देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेश, हरयाणा, चंडीगढ, दिल्ली, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थानमध्ये पुढील २४ तासात अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisement

या वादळाने महाराष्ट्र, गुजरात राज्यांत मोठे नुकसान केले आहे. त्यानंतर हे वादळ आणखी पुढे गेले आहे. आता उत्तर भारतातील अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळ सोमवारी गुजरात राज्यात दाखल झाल्यानंतर कमजोर पडले आहे. तरी देखील या वादळाचा धोका अजून टळलेला नाही. या वादळाने निर्माण केलेल्या दबावाच्या क्षेत्रामुळे आता उत्तर भारतातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply