Take a fresh look at your lifestyle.

लाज बाळगा..! पैशासाठी मृत रुग्णावर केले तीन दिवस उपचार, डॉक्टरवर झाली अशी कारवाई..!

मुंबई : अभिनेता अक्षय कुमार याचा 2015 मध्ये ‘गब्बर इज बॅक’ हा चित्रपट आला होता. सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या रुग्णालयात कशा प्रकारे लुटले जाते, हे त्यात दाखविण्यात आले होते. रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्या नातेवाईकांकडून पैसे उकळण्यासाठी उपचाराचे कसे नाटक केले जाते, हे या चित्रपटातून दाखविले होते. हे सर्व सांगण्याचे कारण म्हणजे असाच काहीसा प्रकार नांदेड येथे घडला. रुग्णाच्या मृत्यूनंतरही त्याच्यावर चक्क तीन दिवस रुग्णालयात उपचार केले जात होते. हा प्रकार समोर आल्यावर संबंधित डॉक्टर व कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली..

Advertisement

तर त्याच झालं असं.. की नांदेड शहरातील एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित अंकलेश पवार यांना दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पैसे उकळण्यासाठी डॉक्टरांनी पवार यांच्या मृत्यूनंतरही त्याच्यावर 3 दिवस उपचार केले. विविध औषध, उपचाराच्या नावाखाली पीडित नातेवाईकांकडून लाखो रुपये उकळले. विशेष म्हणजे, उपचाराचा तपशील मागितला असता, रुग्णालयाने आणखी ४० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

Advertisement

त्यानंतर मृताच्या पत्नीनं न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने संबंधित रुग्णालयातील सर्व डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. अखेर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Advertisement

कोरोनावर उपचार घेण्यासाठी अंकलेश पवार यांना १६ एप्रिल रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, रुग्णालयाने २४ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर केले. २१ ते २४ एप्रिलदरम्यान रुग्णालयाने सुमारे दीड लाख रुपये रुग्णाच्या नातेवाईकांकडून घेतले. तसेच उपचाराच्या नावाखाली विविध औषधं मागवली.

Advertisement

दरम्यान, दोन दिवसांनी फिर्यादी शुभांगी पवार यांनी नवऱ्याचं मृत्यूचं प्रमाणपत्र पाहिलं असता, त्यावर 21 एप्रिल रोजी रात्री साडे अकरा वाजता अंकलेश पवार यांचा मृत्यू झाल्याची नोंद आढळली. त्यानंतर शुभांगी पवार यांनी हॉस्पिटलकडे उपचाराचा तपशील मागितला. मात्र, डॉक्टरांनी त्यासाठी पुन्हा 40 हजार रुपयांची मागणी केली. अखेरीस शुभांगी यांनी न्यायालयात धाव घेतली.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply