Take a fresh look at your lifestyle.

मोदींचे गुजरातसाठी एक हजार कोटीचं पॅकेज जाहीर, महाराष्ट्राला वाटाण्याच्या अक्षदा..!

नवी दिल्ली : तोक्ते चक्रीवादळामुळे (cyclone Tauktae) गुजरातमध्ये झालेल्या नुकसानीची आज (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी गुजरातसाठी एक हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं. तसेच वादळामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाखांची आर्थिक मदत जाहीर केली.

Advertisement

गुजरात (Gujarat), दीव-दमणचं तौक्ते वादळात मोठं नुकसान झालं आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज या भागाची हवाई पाहणी केली. त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी हेही उपस्थित होते. पाहणीनंतर मोदी यांनी गुजरातला एक हजार कोटीचे पॅकेज जाहीर केलं. मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी दोन लाख, तर जखमींना 50 हजाराची आर्थिक मदत जाहीर केली. केंद्र सरकार गुजरातमध्ये ‘इंटर मिनिस्ट्रियल ग्रुप’ पाठवेल. हा ग्रुप राज्यातील नुकसानीची केंद्राला माहिती देईल, असं मोदींनी सांगितलं.

Advertisement

दरम्यान, तौक्ते चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या सर्व राज्यांना केंद्र सरकार लवकरच मदत देणार आहे. संबंधित राज्यांनी केंद्राला नुकसाईची माहिती द्यावी, असे आवाहन केले. गुजरात आणि दीवच्या हवाई पाहणीनंतर मोदींनी अहमदाबादमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तीत नुकसानीचा आढावा घेतला.

Advertisement

‘तौक्ते’ सौराष्ट्रला धडकले
तौक्ते चक्रीवादळ सोमवारी रात्री साडे दहा वाजता सौराष्ट्रला धडकले. त्यामुळे किनारपट्टी भागात जमीन धसण्याचे प्रकार होत होते. सौराष्ट्रातील 21 जिल्ह्यातील 84 तालुक्यात प्रचंड पाऊस झाला. आता पाऊस थांबला असला, तरी या वादळी पावसामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू झाला आहे. मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. विजेचे खांब, सोलर पॅनलही उन्मळून पडले आहेत. अनेक ठिकाणी तर मोबाईल टॉवरही पडले आहेत. अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

Advertisement

वादळामुळे गुजरातमध्ये 40 हजार वृक्ष उन्मळून पडले आहेत. 16,500 कच्ची घरेही पडली आहेत. 2400 हून अधिक गावांमध्ये अजूनही वीज नाही. अनेक ठिकाणी विजेचे खांब तुटले आहेत. 122 कोविड हॉस्पिटलमध्ये वीज नसल्याने अंधार पसरला आहे. वादळामुळे राज्यात लसीकरण कार्यक्रम थांबवण्यात आला आहे. येत्या 20 मे पासून लसीकरणाचा कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

संपादन : सोनाली पवार

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply