Take a fresh look at your lifestyle.

‘हेच तर आहे मोदी सरकारचे धोरण..’;राहुल गांधींनी घेतलाय खरपूस समाचार

दिल्ली : देशात करोनाचे संकट वाढत असतानाही राजकारण कमी झालेले नाही. या संकटाच्या घडीत सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. रोज कोणत्या तरी मुद्द्यावरुन वाद होत आहे. करोना काळातील केंद्र सरकारच्या कारभारावर विरोधक सडकून टीका करत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. करोना विषाणूच्या संकटाच्या काळात मोदी सरकारचे नेमके धोरण काय आहे, हे सुद्धा त्यांनी सांगितले आहे.

Advertisement

राहुल गांधी यांनी ट्विट करत केंद्र सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे. या मुद्द्यावर त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले आहे, की ‘देशात करोना प्रतिबंधक लसी कमी पडत आहेत, तर दुसरीकडे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. मात्र, ध्यान भटकवणे, खोटे पसरवणे, आरडाओरड करुन तथ्य लपवणे हेच मोदी सरकारचे सध्याचे धोरण आहे.’

Advertisement

राहुल गांधी यांनी याआधी अनेक वेळा केंद्र सरकारवर टीका केली आहे. आरोपही केले आहेत. तसेच करोना महामारीस रोखण्यासाठी काही उपाय सुचवले होते. मात्र, केंद्र सरकारने या कशाचीही दखल घेतली नाही. तज्ज्ञांनी सुद्धा वेळोवेळी इशारा दिला होता. करोना विषाणूस रोखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, हे देखील सांगितले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. करोनाची दुसरी लाट देशात आली. या लाटेचा जबरदस्त फटका देशास बसला आहे. दररोज लाखो करोना रुग्ण सापडत आहेत. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. रुग्णालयात ऑक्सिजन मिळत नाही. रुग्णांना औषधोपचार मिळत नाही. ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

Advertisement

करोनाला रोखण्यासाठी लसीकरण हा एक प्रभावी उपाय आहे. मात्र, भारतासारख्या सर्वात मोठ्या लस उत्पादक देशात आज लसी मिळत नाहीत. लसींअभावी अनेक ठिकाणी लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच विरोधक केंद्र सरकारच्या या कारभारावर टीका करत आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply