Take a fresh look at your lifestyle.

म्हणून भारतात आहे बरी परिस्थिती; पहा टिमकी वाजवायला काय अहवाल प्रसिद्ध झालाय ते

दिल्ली : देशात करोना विषाणूचे संक्रमण वाढत असले तरी जगातील विकसित देशांच्या तुलनेत भारतात करोनाचे संक्रमण कमीच असल्याचे आता दिसून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीवरुन जगातील विकसित देशांपेक्षा भारतातील संक्रमण कमी आहे. सध्या करोना रुग्णांच्या बाबतीत भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर असला तरी देशातील लोकसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत देशातील दोन टक्क्यांपेक्षाही कमी लोकसंख्या करोना संक्रमित आहे. मात्र, अमेरिकेसारख्या विकसित देशात हे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षाही जास्त आहे.

Advertisement

करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येचा विचार केला तर भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका आहे. अमेरिकेत आजमितीस ३,३७,१५,९५१ करोना संक्रमित रुग्ण आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. ब्राझीलमध्ये १,५६,२७,४७५ लोक करोनाने संक्रमित झाले आहेत. फ्रांसमध्ये ५८,७७,७८७, तुर्कीमध्ये ५१,१७,३७४ आणि रशियामध्ये ४९,४९,५७३ जणांना करोनाने संक्रमित केले आहे. भारतासारख्या अफाट लोकसंख्या असणाऱ्या देशाचा विचार केला तर येथे अजूनही १०० लोकांमागे करोनाची प्रकरणे खूप कमी आहेत. भारतात आतापर्यंत १.८ टक्के लोक संक्रमित आढळले आहेत. तर अमेरिकेमध्ये १०.१ टक्के, ब्राझील ७.३, फ्रांस ९, तुर्की ६, रशिया ३.४, इटली ७.४, जर्मनी ४.३, अर्जेंटीना ७.३ आणि कोलंबिया देशातील ६.१ टक्के लोकसंख्या करोना संक्रमित आहे.

Advertisement

करोनाची दुसरी लाट देशात धुमाकूळ घालत असताना अजूनही देशातील ९८ टक्के लोकसंख्या करोना संक्रमणापासून सुरक्षित आहे. असे असले तरी या लोकांना करोना होणारच नाही, असे नाही. त्यामुळे करोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण तर गरजेचेच आहे. मात्र नागरिकांनीही करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे तितकेच आवश्यक आहे. दरम्यान, देशात काही दिवसांपासून करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होताना दिसत आहे. करोना संक्रमित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. मात्र, मृत्यूदर कमी झालेला नाही. त्यामुळे टेन्शन वाढले आहे. या लाटेत शहरी भागात तर संक्रमण वाढतच आहे. मात्र, त्या तुलनेत ग्रामीण भागात जास्त करोना रुग्ण आढळून येत आहेत.

Advertisement

संपादन : मुकुंद भालेराव

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply